शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेतून फसवणूक

By admin | Updated: September 9, 2014 00:40 IST

पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून फसवणूक करणारी योजना असल्याची ओड शेतकरी करीत आहे. अधिकारी, शासन व विमा कंपनीने मिळवून पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना

पुसद : पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून फसवणूक करणारी योजना असल्याची ओड शेतकरी करीत आहे. अधिकारी, शासन व विमा कंपनीने मिळवून पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि संरक्षणाकरिता राबविण्यात येणारी पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिातची आहे, असा बागुलबुवा कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी शासन व विमा कंपनी मागील पाच वर्षापासून करीत आहे. प्रत्येक वर्षाला शेतकरी पीक विम्याची रक्कम भरतो. दरवर्षी शेतकऱ्यांचे काही ना काही नुकसान होते. पण शेतकऱ्यांना विम्याचा लाभ म्हणून काहीही मिळत नाही. ज्या शेतात सलग तीन वर्ष नुकसान झाले आहेत किंवा त्या परिसराची आणेवारी सतत तीन वर्ष ५० टक्क्यापेक्षा कमी होत असेल त्याला पीक विमा योजनेचा लाभ देता येईल असे बोलले जाते. शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन केले आहे. खरीप हंगामात पूर, अतिवृष्टी, रोग व किडीमुळे उत्पन्न नाहीसे झाल्यास याचे लाभ मिळणार असल्याचे सांगितले जाते. पीक विमा योजनेत सहभागी घेण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना आवाहन करते. त्यामुळे कृषी विभागाचे धोरण असेल तर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास निश्चित पीक विम्याचा लाभ मिळेल अशी हमी देण्यात आली व कोणाला देण्यात आली त्यांची नावे जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करून सर्वच मालामाल झाले आहेत व होत आहेत. विमा कंपनीने शेतकऱ्यांकरिता आखलेली पीक विमा योजनासुद्धा कृषी विभाग, शासन व विमा कंपनीद्वारे लुबाडण्याचीच सुनियोजित योजना असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)