शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीआय’च्या कापूस खरेदीत हेराफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:27 IST

कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) मार्फत शेतकऱ्यांच्या कापसाची हमी भावाने खरेदी सुरू आहे. या खरेदीत मोठी हेराफेर केली जात आहे. ती दडपण्यासाठी उच्च दर्जाचा कापूस काढून घेऊन तेथे सरकीचा भरणा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.

ठळक मुद्दे‘मार्जीन’ची अ‍ॅडजेस्टमेंटउच्च दर्जाची रुई काढून २० रुपये किलोच्या सरकीचा भरणा

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) मार्फत शेतकऱ्यांच्या कापसाची हमी भावाने खरेदी सुरू आहे. या खरेदीत मोठी हेराफेर केली जात आहे. ती दडपण्यासाठी उच्च दर्जाचा कापूस काढून घेऊन तेथे सरकीचा भरणा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.महाराष्ट्रासह देशभर सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू आहे. महाराष्ट्रात पणन महासंघही सीसीआयच्या दिमतीला आहे. एक क्ंिवटल कापसामध्ये किमान ३५ ते ३६ किलो रूई निघते. उर्वरित सरकी निघते. परंतु पणन व सीसीआयचे ग्रेडर केवळ ३२ ते ३३ क्ंिवटल रूई निघाल्याचे दाखविते. उर्वरित प्रति क्ंिवटल अडीच ते तीन किलो रूईची ‘मार्जीन’ असते. या मार्जीनच्या ‘अ‍ॅडजेस्टमेंट’साठी दोन ते तीन किलो चांगल्या दर्जाची रूई काढून घेऊन तेथे सरकी अतिरिक्त दाखविली जाते. चांगल्या दर्जाच्या रूईचा दर ९० ते ११० रुपये किलो तर सरकीचा दर अवघा २० रुपये किलो आहे. प्रत्येक क्ंिवटलमागे अडीच ते तीन किलो रूई काढली जाते. राज्यात खरेदी होणारा कापूस, त्याचे जिनिंग व त्यातील चोरट्या मार्गाने काढल्या जाणाºया रूईच्या मार्जीनचे गणित काढल्यास सीसीआयमध्ये कोट्यवधी रुपयांची हेराफेरी सुरू आहे. पणन महासंघ व सीसीआयच्या ग्रेडरचे जिनिंग-प्रेसिंग मालकांशी संगनमत आहे.

पुसद घोटाळ्याची चौकशी ‘सीआयडी’कडेयवतमाळ जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी पुसद, राळेगाव येथे ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीतील असेच घोटाळे उघडकीस आले. त्यात गुन्हेही नोंदविले गेले. पुसदच्या संशयास्पद आगीची चौकशी थेट ‘सीआयडी’ मार्फत करण्यात आली.घोटाळा दडपण्यासाठी आगीच्या घटनाकापूस खरेदीच्या हंगामात आणि विशेषत: उन्हाळ्यात जिनिंग-प्रेसिंग व गोदामांना आग लागण्याच्या घटना घडतात. यातील अनेक घटना संशयास्पद असतात. आगीत जेवढ्या गाठी जळतात प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी पट अधिक त्या दाखविल्या जातात. या आगीच्या घटनांच्या आडच सीसीआयमधील कापूस खरेदीत होत असलेले कोट्यवधी रुपयांचे घोटाळे दडपले जातात. यातही ग्रेडर्स व जिनिंग मालकांची मिलीभगत राहते. या घोटाळ्याचे ‘कनेक्शन’ सीसीआयच्या अकोला, औरंगाबाद झोन तसेच मुंबई राज्य मुख्यालयाशी जुळलेले आहेत.हिशेब दडपण्यासाठी गाठींना प्लॅस्टिक!सीसीआयच्या रूईगाठींना पूर्वी लोखंडी पट्ट्यांचे पॅकिंग होते. आग लागल्यास नेमक्या किती रूईगाठी खाक झाल्या याचा हिशेब लावणे या पट्ट्यांवरून सहज शक्य होते. परंतू अलिकडे या रूईगाठींना लोखंडीऐवजी प्लॅस्टिक पट्ट्यांचे पॅकिंग दिले जाते. आग लागल्यास या प्लॅस्टिक पट्ट्या जळून खाक होतात आणि नेमक्या किती गाठी जळाल्या याचा पुरावा मिळत नाही. यातच सीसीआयमधील कोट्यवधींच्या कापूस खरेदी घोटाळ्याचे गुपित दडले आहे. प्लॅस्टिक पट्ट्यांना ‘सीसीआय’मध्ये परवानगी नेमकी दिली कुणी? याचीही चौकशी क्रमप्राप्त ठरते.

टॅग्स :cottonकापूस