शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून चार लाखांनी गंडविले

By admin | Updated: October 9, 2015 00:13 IST

एका बेरोजगार युवकाला तलाठी म्हणून नोकरीस लावून देतो, असे आमिष देऊन त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले.

गुन्हा दाखल : न्यायालयाच्या आदेशाने कारवाई यवतमाळ : एका बेरोजगार युवकाला तलाठी म्हणून नोकरीस लावून देतो, असे आमिष देऊन त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मात्र अनेक दिवस लोटूनही नोकरीबाबत संबंधित व्यक्तीकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या युवकाने जिल्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून संबंधित आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी उमेश हिरामन राठोड (२८) रा. अडगाव याने नोकरीचे आमिष देऊन तुषार सुरेशराव अंतुरकर याच्याकडून चार लाख रुपये घेतले. तुषारला नोकरी लागण्यासाठी चार लाख रुपये द्यावे लागेल, असे आरोपीने सांगितले. तलाठी पदभरती प्रक्रियेतून हे सेटींग लावणार असल्याची बतावणी आरोपीने केली. नोकरीच्या आमिषाने तुषारनेही घरातील सोने-नाणे मोडून रोख रक्कम उमेशकडे दिली. त्यानंतर नोकरीचे नियुक्ती पत्र मिळण्यासाठी वारंवार विचारणा केली. परंतु उमेश प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेत होता. शेवटी पैसा गेला आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तुषारने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने संबंधित आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यावरून वडगाव रोड पोलिसांनी आरोपी उमेश हिरामन राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. (कार्यालय प्रतिनिधी)