शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाण्यासाठी वन्यजीवांची गावांकडे धाव

By admin | Updated: March 11, 2015 01:54 IST

जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. ही जनावरे विशेषत: माकड अनेकांच्या घरात शिरुन साहित्याची नासधूस करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दारव्हा : जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. ही जनावरे विशेषत: माकड अनेकांच्या घरात शिरुन साहित्याची नासधूस करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रोही, रानडुक्कर, हरीण, लांडगा, माकड आदी वन्यजीवांनी वनालगतच्या शेतांमध्ये उच्छाद मांडला आहे. उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे. अनेकांची रबी पिके धोक्यात आली आहे. माकडं शहरात शिरून घरावर वाळविण्यासाठी टाकलेल्या साहित्याची नासधूस करतात. उन्हाळा सुरू झाल्याने महिला विविध प्रकारचे पदार्थ तयार करून घराच्या गच्चीवर वाळविण्यासाठी घालतात. हे पदार्थ माकड फस्त करून टाकतात. हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येण्यास मागेपुढे पाहत नाही. काही दिवसांपूर्वी माकडाने काही जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. बीबट यासारखे हिंस्त्र प्राणीही गावालगत आढळतात. गेली काही दिवसात तालुक्यात तीन बीबट मरण पावले. या घटना गावालगतच घडल्या. त्यामुळे चारा, पाण्याच्या शोधात वन्यजीव आता गावाकडे भटकत असल्याचे स्पष्ट होते. जंगलातच वन्यजिवांसाठी चारा, पाण्याची सोय व्हावी यासाठी विविध योजना राबविल्या जातात. वनविभागाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च यावर केला जातो. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)