शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

सचिन येडा टोळीतील पाच जणांना मोक्काअंतर्गत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

सातत्याने गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात मोक्काची कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोक्का व तडीपारीची कारवाई केली जात आहे. सचिन उर्फ येडा छगन राठोड याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोक्काचा प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला मान्यता मिळाली. त्यानंतर, दोषारोपपत्र तयार करण्यात आले. या टोळीतील पाचही आरोपींना अटक झाली आहे. सचिन उर्फ येडा छगन राठोड (२५) रा.जामनकरनगर, शुभम सुभाष जोगदंड (२२) रा.पांढरी, यश साहेबराव राऊत (२०) रा.अप्सरा टॉकीजच्या मागे, रोहन गणेश इंगळे (१९) रा.जवळा ता.आर्णी, करण प्रेमदास पवार (२३) रा. जामनकरनगर, यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींंची नावे आहेत. सचिन येडा व त्याची टोळी सक्रिय असून, अनेक गंभीर गुन्हे त्यांनी केले आहे. आर्णी मार्गावर बोलेरो पिकअप वाहन अडवून २५ हजार हिसकावले होते, याशिवाय या टोळीने यापूर्वीही गंभीर गुन्हे केले आहेत. सातत्याने गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात मोक्काची कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. आर्णी ठाणेदार पितांबर जाधव व सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले यांनी मोक्काचा तपास करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांच्याकडे परवानगी मागितली. त्यांनी परवानगी दिल्यानंतर तपास करण्यात आली. दोषारोपपत्र तयार करून, अपर पोलीस महासंचालकांकडे मान्यतेला पाठविण्यात आले. २६ मे रोजी या दोषारोपपत्राला मान्यता मिळाली. त्यावरून पाचही आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये शिपाई दिनेश जाधव, पुरुषोत्तम जाधव यांनीही सहकार्य केले. 

संघटित गुन्हेगारांमध्ये भरली धडकी- गंभीर गुन्हे करणाऱ्या तीन टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, दोषारोपपत्राला मान्यता मिळाली आहे. अविनाश चव्हाण (उमरखेड) याच्या टोळीतील आठ सदस्य, अक्षय राठोड टोळीतील ११ सदस्य व आता सचिन येडाच्या टोळीतील पाच सदस्यांवर मोक्का कारवाई केली आहे. याशिवाय एमपीडीए, तडीपारीचीही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस