शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

नेर नगरपरिषद क्षेत्रात सोमवारपासून पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

नाशिक येथील ट्रकचालक खताची पोती घेऊन नेर आणि मांगलादेवी येथे आला होता. प्रकृती बिघडल्याने तो नेरमध्ये थांबला. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर विविध प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. यानंतर शुक्रवारी नेर येथील तेलीपुरा भागातील एका ८३ वर्षीय वृद्धाचा कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोरोनाचा दुसरा बळी । प्रशासनाची सावध भूमिका, व्यापारीही सकारात्मक

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाचा दुसरा बळी गेला. परिणामी जनजीवन पुन्हा विस्कळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सोमवार, १५ जूनपासून पाच दिवस जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही बाहेर पडता येणार नाही. दरम्यान, तालुका प्रशासनाची चिंता वाढली आहे.नाशिक येथील ट्रकचालक खताची पोती घेऊन नेर आणि मांगलादेवी येथे आला होता. प्रकृती बिघडल्याने तो नेरमध्ये थांबला. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर विविध प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. यानंतर शुक्रवारी नेर येथील तेलीपुरा भागातील एका ८३ वर्षीय वृद्धाचा कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू झाला.दोन बळींसह आठ पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनावर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहे. मागील काही दिवसात शहरातील बाजारपेठ प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळात सुरळीत सुरू होती. सर्वीकडे रेलचेल वाढली. शेतीच्या कामाला वेग आल्याने विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकरी शहरात धाव घेऊ लागले. आता पुन्हा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे.नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळावे यासाठी प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. यापूर्वीच्या संचारबंदी काळात नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मास्कचा वापर टाळणे, थुंकणे, गरज नसताना बाहेर फिरणे आदी प्रकार करणाऱ्यांना दंड झालेला आहे. दरम्यान, आनंदवाडी आणि तेलीपुरा परिसर सील करण्यात आला आहे. आरोग्य विभागाची ९० जणांची चमू परिसरातील नागरिकांची तपासणी करत आहे. तहसीलदार अमोल पोवार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नीलेश जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र दुर्गे, ठाणेदार प्रशांत मसराम, योगेश इंगळे, विस्तार अधिकारी अशोक राऊत आदी परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत.आनंदवाडीतील आठ जण कोविड सेंटरमध्येनेर येथील आनंदवाडी परिसरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिच्या संपर्कातील आठ जणांना कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. तेलीपुरा परिसरात आढळलेल्या एका हार्डवेअर दुकानातील दिवाणजीच्या संपर्कात आलेल्या १९ जणांची कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. यातील ८३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पाथ्रड(गोळे) येथे कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध आढळल्याने तहसीलदारांनी तेथील पाहणी केली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या