शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, २४५ नव्याने पॉझेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 19:36 IST

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा आज पुन्हा वाढला असून गत २४ तासात जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर २४५ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा आज पुन्हा वाढला असून गत २४ तासात जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर २४५ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.आज मृत झालेल्या पाच जणांमध्ये यवतमाळ शहरातील ४९ वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील ३० वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील ६६ वर्षीय पुरूष, दारव्हा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरूष आणि पुसद शहरातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या २४५ जणांमध्ये १६५ पुरुष व ८० महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील ४३ पुरुष व १८ महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष, उमरखेड शहरातील ११ पुरुष व सात महिला, वणी शहरातील पाच पुरुष व तीन महिला, आर्णी शहरातील ११ पुरुष व पाच महिला, बाभुळगाव शहरातील २४ पुरुष व पाच महिला, दारव्हा शहरातील १५ पुरुष व १४ महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष व दोन महिला, घाटंजी शहरातील सहा पुरुष व दोन महिला, घाटंजी तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, कळंब शहरातील तीन पुरुष व एक महिला, कळंब तालुक्यातील दोन पुरूष, मारेगाव शहरातील तीन पुरुष, नेर शहरातील तीन पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील एक पुरूष, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व तीन महिला, पांढरकवडा तालुक्यातील तीन पुरूष, पुसद शहरातील १० पुरुष व १३ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरूष, राळेगाव शहरातील सहा पुरुष व एक महिला, महागाव शहरातील पाच पुरूष व दोन महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, तसेच जिल्ह्यातील अन्य ठिकाणचा एक पुरूष व एक महिलेचा समावेश आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून अ‍ॅक्टीव पॉझिटिव्ह आणि होम आयसोलेशन तसेच सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा प्राप्त झाला नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत अ‍ॅक्टीव पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २२४ तर होम आयसोलेशन निरंक दाखविण्यात आले आहे. जिल्ह्यात १६४ मृत्युची नोंद असून सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ३०६ जण भरती आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६३४४४ नमुने पाठविले असून यापैकी ६२०१४ प्राप्त तर १४३० अप्राप्त आहेत. तसेच ५५८६१ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस