शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची सरशी

By admin | Updated: September 6, 2014 02:25 IST

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभेची पहिली निवडणूक १९६२ साली पार पडली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी...

यवतमाळ : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभेची पहिली निवडणूक १९६२ साली पार पडली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार ठिकाणी काँग्रेसने तर एका ठिकाणी अपक्षाने विजय संपादित केला होता. या निवडणुकीत पुसदमधून वसंतराव नाईक, उमरखेडमधून रामचंद्र शिंगणकर, दिग्रसमधून माधवराव महिंद्रे, दारव्हा येथून अली हसन जीवाभाई ममदानी हे काँग्रेसच्या तिकिटावर तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून जांबुवंतराव धोटे अपक्ष विजयी झाले होते. यवतमाळ जिल्ह्यात झालेली ही निवडणूक अतिशय रंगतदार झाली होती. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार उभे होते. काँग्रेसच्या तिकीटावर छबूताई डहाके, जनसंघाकडून नारायण रानडे आणि अपक्ष म्हणून जांबुवंतराव धोटे, बाबूराव येरावार, रामनारायण चमेडिया आणि उद्धवराव वाघमारे रिंगणात होते. या निवडणुकीत अपक्ष जांबुवंतराव धोटे यांनी १९ हजार १३७ मते घेत काँग्रेसच्या छबूताई डहाके यांचा पराभव केला होता. दारव्हा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अलीहसन जीवाभाई ममदानी २७ हजार ५८२ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी हनुमंतगिर महादेवगिर (अपक्ष), हिरामन सोनडवले (रिपाइं) आणि महादेव भोवते यांचा पराभव केला. दिग्रस विधानसभा मतदारसंघात केवळ चार उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे माधवराव महिंद्रे यांनी शेकापचे गोविंदराव पुंजाजी बुचके यांचा पराभव केला. या निवडणुकीत जनसंघाचे नामदेवराव चव्हाण आणि अपक्ष झियाउद्दीन इसाक सईद रिंगणात होते. नाईक घराण्याचा परंपरागत गड असलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात १९६२ च्या निवडणुकीत वसंतराव नाईक काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. पुढे ते मुख्यमंत्री पदीही विराजमान झाले. वसंतराव नाईकांनी नलिनीबाई मुखरे (अपक्ष), बाबाराव लोखंडे (रिपाइं), किसन पाईकराव (अपक्ष) यांचा पराभव केला. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजतागायत या मतदारसंघावर नाईक घराण्याचेच वर्चस्व आहे.उमरखेड हा १९६२ साली अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ होता. या मतदारसंघात रामचंद्र नामदेवराव शिंगणकर हे काँग्रेसच्या तिकिटीवर विजयी झाले. त्यांनी विश्वासराव कांबळे (अपक्ष) आणि साहेबराव शिरसाट (रिपाइं) यांचा पराभव केला. महाराष्ट्र स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. काही निवडणुकांचा अपवाद वगळता हा जिल्हा सदैव काँग्रेसच्याच पाठीशी दिसत आहे. ( नगर प्रतिनिधी)