शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा चटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
3
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
4
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
5
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
6
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
7
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
8
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
9
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
10
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
11
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
12
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
13
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
15
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
16
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
17
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
18
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
19
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
20
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
Daily Top 2Weekly Top 5

‘जोश’च्या पहिल्या दिवशी सखींनी गाजविल्या स्पर्धा

By admin | Updated: January 8, 2017 00:59 IST

लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश’च्या पहिल्या दिवशी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत

यवतमाळ : लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश’च्या पहिल्या दिवशी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले. येथील दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित या स्पर्धेत पहिला दिवस गाजला तो सोलो नृत्य स्पर्धेने.
स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी आणि सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पहिल्या दिवशीच्या स्पर्धेला सुरूवात झाली. सर्वप्रथम डोहाळे गीत (पाळणा गीत) स्पर्धा झाली. सखींनी यात विविध डोहाळे गीत सादर केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सरला चिद्दरवार, व्दितीय क्रमांक स्मीता गंधे आणि तृतीय क्रमांक विद्या बेहरे यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मेघा इसराणी, प्राप्ती चिंतावार यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत गंगा राठोड, विद्या बेहरे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यानंतर वाटण्यापासून नमकीन पदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धे प्रथम क्रमांक कांचन निंबेकर आणि व्दितीय क्रमांक अ‍ॅड़ सरोज बरदेहे यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नंदा तलरेजा आणि अर्चना इसराणी यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत माला टाके व अल्पा व्यास यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर थर्माकोलपासून दागिने तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सखींनी थर्माकोलपासून सुरेख दागिणे तयार केले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जयश्री तळणकर, व्दितीय क्रमांक योगीता उघडे आणि तृतीय क्रमांक कविता लढ्ढा यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून पूजा बाजोरिया आणि शोभा नेमाणी यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत अ‍ॅड़ सरोज बरदेहे आणि मेघा डाहे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले.
चिन्हाचा उपयोग करून रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कांचन निंबेकर, व्दितीय दीपाली झोपाटे आणि तृतीय क्रमांक सीमा कोकेवार यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राखी खत्री, ज्योती गोल्हर यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत
जयश्री मडावी, उषा सरमखे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले.
यानंतर घेण्यात आलेल्या हास्य नाटिका स्पर्धेत प्रथम क्रमांक छाया राठी व अरुणा चांडक यांनी तर व्दितीय क्रमांक माला टाके व अल्पा व्यास यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून शुभदा हातगावकर, विद्या बेहरे यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत स्मीता गंधे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. सायंकाळी दर्डा मातोश्री सभागृहात सोलो डान्स स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सखींनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मानसी सांगानी यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून आशंता बुटले यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत छाया राठोड यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना लोकमत सखीमंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. (उपक्रम प्रतिनिधी)

सखी मंच सदस्य नोंदणी
लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. ५०० रुपये शुल्क भरुन सखींना सदस्य होता येणार आहे. सदस्य होणाऱ्या सखींना अंजली कंपनीचे फ्रायपॅन गिफ्ट दिले जाणार आहे. नोंदणीसाठी लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, दर्डानगर, लोकमत जिल्हा कार्यालय गांधी चौक यवतमाळ (०७२३२-२४८११९), सुषमा गणात्रा, आर्णी रोड (८०८७२३८४८७), शारदा गांधी, धामणगाव रोड (९९२३३३३६२०), अलका राऊत, जलाराम बाप्पा मंदिराजवळ, श्रीकृष्णनगर (९९२२६६१४८७), छाया राठोड, अंजनेय सोसायटी (७५०७६३०१७०), छाया राठी, आशुतोष अपार्टमेंट, सत्यनारायण ले-आऊट (९४२०६२२७९९) यांच्याशी संपर्क साधावा.