सफाई कामगारांचे श्रमासोबत आर्थिक योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:59+5:30

कोरोनाविरूद्धच्या लढाईत सख्खे नातेवाईकही रुग्णांपासून दूर जात असल्याची उदाहरणे आहेत. अशा स्थितीत कोरोना वॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या सफाई कामगारांनी आर्थिक मदत शासनाकडे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश बामने यांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीचे आवाहन केले.

Financial contribution of cleaning workers along with their labor | सफाई कामगारांचे श्रमासोबत आर्थिक योगदान

सफाई कामगारांचे श्रमासोबत आर्थिक योगदान

Next
ठळक मुद्देकोरोनाविरूद्ध लढा, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाविरोधाच्या लढ्यात सर्वात पुढे असलेला सफाई कामगार श्रमासोबत आर्थिक योगदानासाठीही पुढे आला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना वॉर्डासह सर्वत्र सफाईचे काम करणाऱ्या कामगारांनी एकत्र येत मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजारांची राशी दिली.
कोरोनाविरूद्धच्या लढाईत सख्खे नातेवाईकही रुग्णांपासून दूर जात असल्याची उदाहरणे आहेत. अशा स्थितीत कोरोना वॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या सफाई कामगारांनी आर्थिक मदत शासनाकडे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश बामने यांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीचे आवाहन केले. एक नव्हे तर ९७ सफाई कामगारांनी एकत्र येवून आपल्या तुटपुंज्या वेतनातून ५१ हजारांची राशी जमा केली. ही रक्कम राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधीला दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे निधी सुपूर्द करताना सफाई कामगार किशोर चिंडाले, श्याम कोंडावे, संदीप चौधरी, राहुल पवार, विजय चिंडाले, मुकेश बामने, राजेश पवार, नरेश ब्राह्मणे, जय तांबे, राकेश ब्राह्मणे, सनी चपेरिया, संजय बामने, शिवा बालवे, अनिकेत चव्हाण, सुमित केवारकर, मनोहर ब्राह्मणे, विजय चावरे, रूपेश जेदे, शरद मोगरे, अमित व्यास, सय्यालाल व्यास, चेतन पवार आदी उपस्थित होते.

कर्तव्यासोबत दायित्व
कोरोना वॉर्डात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाºया सफाई कामगारांनी आपल्या कर्तव्यासोबतच दायित्वाचेही भान जपले आहे. कोरोना वॉर्डाच्या जवळ फिरकण्याचीसुद्धा कुणी हिंमत करत नाही. जोखमीचे काम आहे याची पूर्ण जाणीव असतानाही हे सफाई कामगार आपली सेवा बजावत आहे. यासोबतच त्यांनी शासनाच्या अडचणीत मदतीसाठी हात पुढे केला आहे.

Web Title: Financial contribution of cleaning workers along with their labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.