सण-उत्सव, निवडणुकीचा पोलिसांवर पडला ताण

By Admin | Updated: September 21, 2014 23:59 IST2014-09-21T23:59:01+5:302014-09-21T23:59:01+5:30

विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आता लागू झाली आहे. याच काळात विविध सण, उत्सव येत असल्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी पोलिसांना

Festive season, falls on election police tension | सण-उत्सव, निवडणुकीचा पोलिसांवर पडला ताण

सण-उत्सव, निवडणुकीचा पोलिसांवर पडला ताण

वणी : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आता लागू झाली आहे. याच काळात विविध सण, उत्सव येत असल्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी पोलिसांना सुखाची झोप मिळणे दुरापास्त होणार आहे.
वणी उपविभागात वणीसह, मारेगाव, मुकुटबन, शिरपूर आणि पाटण येथे पोलीस ठाणे आहे. वणीला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या पाचही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील काही गावे संवेदनशील आहेत. काही गावे नक्षल प्रभाविीा आहेत. या उपविभागाची सीमा आंध्र प्रदेशला लागून आहे. आंध्र प्रदेशात नक्षली कारवाया जादा असतात. त्याचा फटका सीमावर्ती पोलीस ठाण्यातील काही गावांनाही बसतो. त्यामुळे वणी उपविभागातील पोलिसांना सतत जागृत राहावे लागते.
उपविभागातील पाचही पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात दरवर्षी दुर्गादेवींची स्थापना केली जाते. गेल्या काही वर्षांपासून दुर्गादेवीच्या मूर्ती स्थापनेत वाढ झाली आहे. खुद्द वणी पोलीस ठाण्याच्या मागेच दरवर्षी दुर्गा मूर्तीची स्थापना केली जाते. गावोगावी मोठ्या प्रमाणात मूर्तींची स्थापना होत असल्याने प्रत्येक पोलीस ठाण्याला नवरात्रात पोलीस बंदोबस्त लावावा लागतो. त्यासाठी पोलीस बळ कामी जुंपावे लागते. नवरात्राची सांगता विजया दशमीने होते. त्यानंतर बकरी ईद हा पवित्र सणही येतो. या सर्व सणांनंतर १५ दिवसांतच दिवाळीची सुरूवात होते.
सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात विविध धर्मीयांचे विविध सण येतात. त्यामुळे दरवर्षी पोलिसांना बंदोबस्त लावावा लागतो. आता यावर्षी या सणांसोबतच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताणही वाढला आहे. सर्व धर्मीयांचे सण आणि निवडणूक बंदोबस्त लावताना पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे.
दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूक आणि उमेदवारांच्या रॅलीने पोलिसांची भंबेरी उडण्याची शक्यता आहे. नवरात्राला येत्या २५ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. त्याच काळात उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरूवात होणार असल्याने पोलिसांची चांगलीच कसोटी लागण्याची शक्यता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Festive season, falls on election police tension