विजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:21+5:30

दत्तात्रय केशवराव घुगे (५९) आणि भावेश दत्तात्रय घुगे (२१) असे मृत वडील व मुलाचे नाव आहे. मुलगा भावेश पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी उठला होता. तो लघुशंकेसाठी बाथरूममध्ये गेला. तेथे असलेल्या अर्थींगच्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला. विजेचा धक्का बसल्याने तो ओरडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज वडील दत्तात्रय घुगे झोपेतून उठले. त्यांनी लगेच बाथरुमकडे धाव घेतली. त्यांनाही अर्थींच्या तारेचा स्पर्श झाला.

Father and son die of electric shock | विजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू

Next
ठळक मुद्देआर्णी तालुक्यातील कवठाबाजारची घटना : निवृत्त वायरमनचा विजेनेच केला घात

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलेल्या मुलाला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला. त्याच्या किंचाळण्याने वडील त्याला वाचविण्यासाठी धावले. मात्र यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील कवठाबाजार येथे शुक्रवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
दत्तात्रय केशवराव घुगे (५९) आणि भावेश दत्तात्रय घुगे (२१) असे मृत वडील व मुलाचे नाव आहे. मुलगा भावेश पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी उठला होता. तो लघुशंकेसाठी बाथरूममध्ये गेला. तेथे असलेल्या अर्थींगच्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला. विजेचा धक्का बसल्याने तो ओरडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज वडील दत्तात्रय घुगे झोपेतून उठले. त्यांनी लगेच बाथरुमकडे धाव घेतली. त्यांनाही अर्थींच्या तारेचा स्पर्श झाला.
या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी भावेशचा मामा कैलास दहिफळे गेला. त्यांनाही विजेचा धक्का बसून त्यांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व गावकरी हादरून गेले. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. मृतक दत्तात्रय घुगे मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी होती. ते निवृत्त वायरमन असून गेल्या १० वर्षांपासून कवठाबाजार येथे वास्तव्याला होते. वडील व मुलाच्या मृत्युमुळे कवठाबाजारमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Father and son die of electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.