शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

महागाव तालुक्यात शेतकऱ्याचा खून

By admin | Updated: June 11, 2017 00:19 IST

तालुक्यातील अनंतवाडी येथील शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. सदर शेतकऱ्यावर महिनाभरापूर्वी

अनंतवाडीतील हल्ला : अज्ञाताविरुद्ध गुन्हा लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यातील अनंतवाडी येथील शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. सदर शेतकऱ्यावर महिनाभरापूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा ६ जून रोजी मृत्यू झाला. महागाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. श्रावण तुकाराम हनवते (४५) रा.अनंतवाडी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. श्रावण हनवते ११ मे रोजी सायंकाळी ज्वारीच्या राखणीसाठी शेतात गेले होते. नेहमीप्रमाणे त्या दिवशीही ते शेतात पोहोचले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळ होवूनही ते जागलीवरून घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या जावयाने शेताकडे धाव घेतली. ते शेतात पोहोचल्यानंतर त्यांना श्रावण हनवते रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी लगेच कुटुंबीयांना माहिती देवून श्रावण हनवते यांना तातडीने पुसद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या डोक्याला जबर मार असल्याने नंतर त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. जवळपास महिनाभर नांदेड येथील रुग्णालयात श्रावण हनवते यांच्यावर उपचार सुरू होते. शेवटपर्यंत ते बेशुद्धावस्थेत होते. डोक्याला जादा मार असल्याने त्यांच्या मेंदूतून रक्तस्त्राव सुरू होता, असे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. महिनाभर उपचार करूनही श्रावण हनवते यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर ६ जून रोजी उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे भाऊ उत्तम हनवते यांनी महागाव पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविल्याचे ठाणेदार करीम मिर्झा यांनी सांगितले.