कामठवाडा येथे शेतकऱ्यांची निदर्शने

By Admin | Updated: June 3, 2017 00:50 IST2017-06-03T00:50:30+5:302017-06-03T00:50:30+5:30

किसान क्रांती समन्वय समितीने शेतकरी संपाची हाक दिली आहे. या आंदोलनाला कामठवाडा, चाणी, लिंगा आणि चिकणीतील शेतकऱ्यांनी पाठींबा दिला आहे.

Farmers' demonstrations at Kamtwada | कामठवाडा येथे शेतकऱ्यांची निदर्शने

कामठवाडा येथे शेतकऱ्यांची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरीअरब : किसान क्रांती समन्वय समितीने शेतकरी संपाची हाक दिली आहे. या आंदोलनाला कामठवाडा, चाणी, लिंगा आणि चिकणीतील शेतकऱ्यांनी पाठींबा दिला आहे. शेतकऱ्यांनी राज्यमार्गावर दिवसभर निदर्शने केली. ढोल ताशा लावुन सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.
विलास भालदांड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंढरीनाथ गुल्हाणे, अजय डवले, पंडीत हिंगासपुरे, जीवन ठोकळ, रामभाऊ ऊके, उमेश लांडे, संतोष शिंदे, गणेश पवनकार, विष्णू कबाडे, महादेव नेमाने, सुरेश लांडे, सुरेन्द्र घुले, अजय डवले, शिवदास ठोकळ, गणेश ठोकळ, पांडूरंग तंबाके, बबलू झेंडे, यांच्यासह अनेक शेतकरी मोठया संखेने सहभागी झाले होते.

Web Title: Farmers' demonstrations at Kamtwada