शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रायोगिक तत्त्वावर समाज कल्याणची अभ्यासिका

By admin | Updated: May 30, 2016 00:16 IST

स्पर्धा परीक्षेत मागास विद्यार्थी मागे पडतात. अनेकांना स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असतानाही परीक्षेची तयारी करता येत नाही.

पहिला प्रयोग : १६ पंचायत समितीत राबविला जाणार उपक्रमरूपेश उत्तरवार  यवतमाळस्पर्धा परीक्षेत मागास विद्यार्थी मागे पडतात. अनेकांना स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असतानाही परीक्षेची तयारी करता येत नाही. म्हणून समाजकल्याण विभागाने अभ्यासिकेचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नि:शुल्क राहणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेने अभ्यासिकेचा पहिला प्रयोग राबविण्यास प्रारंभ केला आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने सेस फंडाच्या राखीव निधीतून अभ्यासिका वर्ग राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरच अभ्यासिका वर्ग उघडण्यात आला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकरिता लागणारे सर्व पुस्तक उपलब्ध करण्यात आले आहेत. यासोबतच सर्व वृत्तपत्र, चांगल्या प्रकाशनाचे पुस्तक ठेवण्यात आले आहेत. सकाळी ७ पासून ते सायंकाळ ७ पर्यंत हा अभ्यासिका वर्ग खुला ठेवण्यात येणार आहे. यानंतर पंचायत स्तरावर अथवा मध्यवस्तीत जागा उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी अभ्यासिका वर्ग सुरू होणार आहे. यामुळे तालुका स्तरावरही विद्यार्थ्यांना अभ्यासिका वर्गात स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणार आहे.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी म्हणून अभ्यासिका वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्हा परिषदेत हा प्रयोग राबविण्यात आला. यानंतर पंचायत समिती स्तरावर तो राबविता येणार आहे.- जया राऊत, समाजकल्याण अधिकारी, यवतमाळ