शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून अपेक्षा ‘न्याया’ची

By admin | Updated: September 3, 2014 23:44 IST

स्थानिक मंत्र्यांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यास ते सर्वांना न्याय देऊ शकत नाही, या सरकारच्या भूमिकेवर अखेर यवतमाळातील निधीच्या पळवापळवीने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

यवतमाळ : स्थानिक मंत्र्यांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यास ते सर्वांना न्याय देऊ शकत नाही, या सरकारच्या भूमिकेवर अखेर यवतमाळातील निधीच्या पळवापळवीने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. पालकमंत्रीपद कुणाकडे असावे यावरून राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये बऱ्याच चर्चा रंगल्या. सन २००९ च्यापूर्वी पालकमंत्रीपद त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे होते. मात्र त्यानंतर तक्रारी झाल्याने हे धोरण बदलविण्यात आले. जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांकडे जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी दिली गेली. मात्र त्यांच्या डीपीसी आणि ध्वजारोहणापलिकडे न जाणाऱ्या कारभारावरही टीका होऊ लागली. तरीही त्या कारभाराला आघाडी सरकारने चार वर्षे काढली. अखेरच्या वर्षात मात्र पालकमंत्री त्या-त्या जिल्ह्यातच देण्याबाबतचा सूर राजकीय स्तरावर आवळला गेला. विधानसभेच्या दृष्टीने तयारी करता यावी, जिल्ह्याला ‘आपल्या सोईने’ न्याय देता यावा, कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहता यावे, शासकीय यंत्रणेचा पाहिजे तेथे वापर करता यावा हे छुपे उद्देश या मागे होते. त्यासाठी रुसवे फुगवेही झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी काही पालकमंत्री बदलविले. त्यांना आपल्या गृहजिल्ह्याची जबाबदारी दिली गेली. यवतमाळचे पालकमंत्री पद डॉ. नितीन राऊत यांच्याकडून काढून घेऊन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे सोपविले गेले. मात्र अवघ्या महिनाचभरात मोघेंच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिमगा करणे सुरू केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या १४ कोटींच्या निधीतील एक चतुर्थांश निधी मोघेंनी आपल्या केळापूर-आर्णी या गृहविधानसभा मतदारसंघात पळविल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. तर आचारसंहितेपूर्वी निधी खर्च करायचा होता, असा बचाव मोघेंनी घेतला. या प्रकरणामुळे मात्र मंत्री आपल्या गृहजिल्ह्याला आणि सर्व पक्षांना पालकमंत्री म्हणून समान न्याय देऊ शकत नाही, या सरकारच्या भूमिकेवर मात्र पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. हा अनुभव लक्षात घेता भविष्यात जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री हे धोरण कायम राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)