शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम हटाव आंदोलन

By admin | Updated: March 26, 2017 01:16 IST

निवडणुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी करणे सहज शक्य आहे. यामुळे लोकशाहीला वाचवायचे असेल, ..

मशीनचे सर्व मानक अपूर्णच : पुढील निवडणुकीनंतर पेपर ट्रेलरयवतमाळ : निवडणुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी करणे सहज शक्य आहे. यामुळे लोकशाहीला वाचवायचे असेल, तर ईव्हीएम मशीन हद्दपार करावी, अशी मागणी रेटून राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलन समितीने ७२ तासांचे देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. स्थानिक तिरंगा चौकामध्ये राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ अांदोलन समितीच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले. ईव्हीएम मशिनच्या वापरासाठी अंतरराष्ट्रीयस्तरावर ७ मानक निश्चित करण्यात आले आहेत. ते निकष अद्यापही पूर्ण झाले नाही. एखाद्या उमेदवाराने आक्षेप नोंदविला, तर या प्रक्रियेत पुन्हा मतमोजणीची तरतूद नाही. या मशीन संदर्भात २००४ मध्ये आक्षेप नोंदविला गेला आणि न्यायालयात याचिका दाखल झाली. न्यायालयाने केंद्र शासनाला या मशिनला पेपर ट्रेल बसविण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यासाठी निवडणूक आयोगाने ३० महिन्यांचा अवधी मागितला.या ३० महिन्यांत २०१९ च्या निवडणूका संपून जाणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये पेपर ट्रेल ज्या ठिकाणी लावण्यात आले, त्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला, असा दावा आंदोलकांनी केला आहे. यामुळे ईव्हीएम मशीन संशयाच्या भोवऱ्यात आहे. अनेक प्रगत देशांसोबत ज्या देशात ईव्हीएम मशिनची निर्मिती होते, त्या देशांत मशिनचा वापर होत नाही. यामुळे देशातुन ईव्हीएम हद्दपार करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व राज्यव्यापी लोकतंत्र बचाव समितीचे जिल्हा संयोजक विजयराज शेगेकर यांनी केले. यावेळी संजय कोरडे, अ‍ॅड. अनिल किन्नाके, सारिका भगत, भाग्यश्री तिरमारे, अर्चना कयापाक, इंदूताई मोहर्लीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. हे आंदोलन सतत ७२ तास चालणार आहे. (शहर वार्ताहर)