शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी जीवनाचा सार ‘ध्याना’त

By admin | Updated: September 21, 2014 00:03 IST

धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण. यातून वाढलेले विस्मरण अलीकडे प्रत्येकासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यासाठी दररोज अर्धा तास ध्यान करण्याची आवश्यकता आहे.

जागतिक स्मृतिभ्रंश दिवस : मार्इंड पॉवर, मेंदूला हवी आठवणीची सवयंयवतमाळ : धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण. यातून वाढलेले विस्मरण अलीकडे प्रत्येकासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यासाठी दररोज अर्धा तास ध्यान करण्याची आवश्यकता आहे. याबाबत ‘लोकमत’ने मार्इंड पॉवरच्या कार्यकर्त्याशी साधलेला संवाद.जगातील यशस्वी लोकांनी आपल्या बुध्दीमत्तेचा केवळ दहा टक्केच वापर केला. अलीकडील तीन दशकाचा विचार केला तर अलबर्ड आईनस्टाईन हे सर्वात विद्वान व्यक्ती मानले जाते. परंतु त्यांनीही केवळ ४.५ टक्केच मेंदूचा वापर केला. सर्वसामान्य लोक आपल्या बुध्दीमत्तेचा दररोज केवळ ०.५ टक्केच वापर करतात. त्यांना आपल्या बुध्दीमत्तेचा वापर अधिक वाढविणे सहज शक्य आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांनी बुध्दीमत्तेचा वापर वाढविल्यास जीवनात यशाचे शिखर गाठणे सहज शक्य आहे.या बाबत सामाजिक प्रबोधन करणारे अजित डेहणकर यांनी सोप्या पध्दती सांगितल्या आहे. मेंदूला आठवण ठेवण्यासाठी सवय करावी लागते. आपण महत्त्वाच्या घटनांनाच लक्षात ठेवतो. प्रत्यक्षात प्रत्येक गोष्ठ मेंदूत रेकॉर्ड होते, ती बाहेर काढण्यासाठी शास्त्रशुध्द पध्दत आहे. यामध्ये ध्यान हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच हिप्नोथेरपीमधूनही माहिती मिळविणे शक्य आहे.आपले वय जितके तितकाच वेळ ध्यान केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी मांडी घालून बसणे आणि श्वासांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. दररोज आपण झोपी गेल्यावर जागृत मन झोपते. मात्र अर्धजागृत मन यावेळी कार्य करते. त्यामुळे उठल्यावर आपल्या मनात जे विचार येतात ते नोंदविले पाहिजे. कुठलीही घटना आपल्या सोबत घडण्यापूर्वी ती आपल्या डोक्यात घर करते. नंतर घटना घडते. त्यामुळे आपल्या डोक्यात सकारात्मक विचार असावे. आपल्या प्रत्येक विचाराचा वर्तनावर परिणाम होतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे ध्ये निश्चित करून वाटचाल करीत राहिल तर, नेहमीच त्यामध्ये यश मिळते. त्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. स्मृतिभ्रंश होऊ नये म्हणून दररोज घरातील सर्व वस्तू पाहून त्या कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करावा. अथवा बाजारात ज्या गोष्टी आपण पाहिल्या, त्या लिहिण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टी आपल्याला सहज आठवतात. (शहर वार्ताहर)