शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजी मिटवा, पक्ष वाढवा

By admin | Updated: April 13, 2015 01:01 IST

नेत्यांनी आता अंतर्गत गटबाजीतून बाहेर यायला हवे, पक्ष वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जावे, भविष्यातील

काँग्रेस नेत्यांना साद : पराभवातून धडा घेण्याचा सल्लायवतमाळ : नेत्यांनी आता अंतर्गत गटबाजीतून बाहेर यायला हवे, पक्ष वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जावे, भविष्यातील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी साद काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना घातली. अलीकडेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांच्या पुढाकारात झालेल्या एका बैठकीत गटबाजी आणि पक्ष विस्तार या प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली. काँग्रेस नेत्यांनी गटबाजीचे राजकारण थांबवावे, पक्ष विस्तार व वाढीच्यादृष्टीने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र त्यांच्या आवाहनाला उपस्थितांपैकी काहींनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे सांगण्यात येते.वास्तविक काँग्रेसच्या कार्यक्रमाशिवाय पहिल्यांदाच हे नेते बाहेर एकत्र बसले. कार्यकर्त्यांसाठी ही बाब दिलासादायक ठरणारी आहे. कारण पक्षाच्या व्यासपीठावर हे नेते एकत्र दिसत असलेतरी प्रत्यक्षात त्यांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह लावले जात होते. प्रत्येकजण आपल्या विधानसभा मतदारसंघापुरते राजकारण करीत होते. पक्षाचा जिल्हा किंवा राज्यस्तरावर वाढीच्यादृष्टीने तेवढा विचार करताना कुणी दिसले नाही. नेतेच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाडापाडीचा संदेश पोहोचवित असल्याने कार्यकर्तेही संभ्रमात सापडले होते. काठावरील कार्यकर्त्यांचे ठीक मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांची तर आणखीच कोंडी झाली होती. नेतेच गटबाजीला खतपाणी घालत असल्याचे पाहून कार्यकर्ते आणखी विखुरले होते. पुढे हे कार्यकर्ते या नेत्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यातील नेत्यांना बसला. काँग्रेसचे हे नेते आपल्या पक्षाचे काम करत आहेत की विरोधी पक्षाचे हेच मतदानाच्या आकडेवारीवरून समजेनासे झाले होते. आर्णी-केळापूर हा मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला असताना तेथे लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला तब्बल ६० हजार मतांची आघाडी मिळाली. हीच स्थिती वणी मतदारसंघात होती. काँग्रेसच्या ताब्यातील अन्य मतदारसंघातही विरोधी पक्षाचा उमेदवारच आघाडीवर होता. गटबाजीच्या या राजकारणाचा या नेत्यांना विधानसभेतही फटका बसला. काँग्रेसच्या ताब्यातील पाचही मतदारसंघ भाजपाने हिसकावून घेतले. या पराभवानंतर जमिनीवर आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आता पक्षासाठी विचार करण्याची सवड मिळू लागली. एरवी मतदार तर दूर कार्यकर्त्यांनाही दर्शन दुर्लभ झालेले हे नेते आता मतदारसंघात दिसू लागले आहेत. मतदारांनी जमिनीवर आणल्याने झोप उघडलेल्या या नेत्यांनी पुन्हा पक्षासाठी काहीतरी करण्याची तयारी सुरू केल्याचे दिसते. त्यातूनच प्रमुख पाच नेत्यांची बैठक झाली आणि त्यात गटबाजी संपविणे, पक्ष वाढविणे, सहकारी तसेच विरोधी पक्षाला रोखणे, आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करणे यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. मुळात माणिकरावांच्या राजकारणावरच जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये रोष पाहायला मिळतो. लोकसभा निवडणुकीत माणिकराव ‘माझ्याकडे राज्याची जबाबदारी आहे’ असे सांगत जिल्ह्यातून कायम बाहेर राहिले, तर याच उलट स्थिती विधानसभेत पाहायला मिळाली होती. मुलगा यवतमाळ मतदारसंघात उभा असल्याने माणिकरावांनी बहुतांश वेळ येथेच घालविला. त्यावेळी माणिकरावांकडे राज्याची जबाबदारी नव्हती का, असा प्रश्न आजही कार्यकर्ते विचारित आहेत. माणिकरावांच्याच गटबाजीच्या राजकारणाला येथील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कंटाळल्याचे दिसून येते. वामनरावांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देण्यासाठी पक्षातीलच चार-पाच चेहरे पुढे करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांचा बोलविता धनी कोण, हे सर्वश्रूत आहे. तरीही वामनरावांनी एकजुटीचे आवाहन या नेत्यांना केले. त्यांना किती प्रतिसाद मिळतो याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)