शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाने वणीचे रस्ते झाले चिंचोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

व्यापाऱ्यांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. कायम गर्दी राहणाºया या मार्गाने वाहन नेताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. गंभीर बाब म्हणजे या अतिक्रमणाच्या विषयात पालिका प्रशासन गप्प बसले असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवाहतुकीचा प्रश्न गंभीर : नव्या सिमेंट रस्त्यांवर ठेवले जाते विक्रीचे साहित्य

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरातील खाती चौक ते तुटी कमान या मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले खरे, परंतु व्यापाऱ्यांनी नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरच दुतर्फा दुकानातील साहित्य ठेवणे सुरू केल्याने या मार्गाने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. कायम गर्दी राहणाऱ्या या मार्गाने वाहन नेताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. गंभीर बाब म्हणजे या अतिक्रमणाच्या विषयात पालिका प्रशासन गप्प बसले असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.वणी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक परिसरातील बहुतांश रस्ते अतिक्रमणाने व्यापले असून त्यामुळे रस्त्यावर वाहतूक प्रभावित होत आहे. चार महिन्यांपूर्वी खाती चौक ते तुटी कमान या ३४० मिटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंटीकरणखाती चौक ते तुटी कमान रस्त्यासाठी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले. ३४० मिटर लांबी, आठ मिटर रुंदीच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले. विशेष म्हणजे रस्ता तयार करताना दुचाकी वाहने उभी करण्यासाठी व्यावसायिक प्रतिष्ठानापासून पुढे पाच फुट पेवर ब्लॉक तयार करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी व्यापारीच दुकानातील साहित्य ठेवत असलेल्या दुकानात येणारा ग्राहक आपले वाहन रस्त्यावरच उभे करतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पूर्वी वाहतूक नियंत्रणासाठी खाती चौकात वाहतूक शिपाई तैनात रहायचे. परंतु आता या ठिकाणी हे शिपायी कधीच दिसत नसल्याने वाहतूक अनियंत्रीत झाली आहे.बाजारपेठेत ऑटोरिक्षा चालकांचा धुमाकूळवणीतील बाजारपेठेत अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. व्यापाऱ्याकडून वर्दळीच्या रस्त्यावरच सांहत्य ठेवले जात असल्याने अगोदरच चिंचोळे असलेले रस्ते आणखी अरूंद झाले आहेत. त्यात बाजारपेठेत प्रवासी मिळविण्यासाठी ऑटोचालकांचा धुमाकूळ सुरू आहे. गर्दीतही हे ऑटोचालक अनियंत्रीतपणे ऑटो चालवित असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. कुणी हटकल्यास ह ऑटोचालक हटकणाऱ्याचाच पानउतारा करताना दिसतात.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा