पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढविरूध्द एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST2021-06-19T04:27:47+5:302021-06-19T04:27:47+5:30

पुसद : विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व इतर वस्तूंच्या दरवाढीविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांना ...

Elgar against petrol, diesel, gas price hike | पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढविरूध्द एल्गार

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढविरूध्द एल्गार

पुसद : विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व इतर वस्तूंच्या दरवाढीविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

कोरोनाच्या महामारीत जनतेचे जगणे कठीण झाले. रोजगार, व्यापार, शेती, व्यवहार ठप्प झाले. अशावेळी सतत दरवाढ करून केंद्र सरकार जनतेची लूटमार करीत आहे. महागाईसाठी काँग्रेसवर टीका करणारे भाजप नेते केंद्रात भाजपा सरकार बसल्यावर भाव दुपटीने वाढवित आहेत. या भाववाढीचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध केला.

ही भाववाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. निवेदन देताना अब्दुल रहेमान चव्हाण, फिरोज खान, संतोष आंभोरे, मोहम्मद जिब्रान, निखिल टोपलेवार, राज खान आदी उपस्थित होते.

Web Title: Elgar against petrol, diesel, gas price hike