शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

वसंतनगर येथील नागेश कम्प्यूटरच्या समोरील कॉम्प्लेक्समधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये जवळपास ३० ते ३५ टीव्ही, प्रोजेक्टर, लॅपटॉप, बारा संगणक यासह इतर साहित्य जळून खाक झाले. दुकानाला आग लागल्यामुळे सात ते आठ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देआठ लाखांचे नुकसान : संगणक, लॅपटॉप, प्रोजेक्टर जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता भीषण आग लागली. या आगीत इलेक्ट्रॉनिकचे सर्व साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले.वसंतनगर येथील नागेश कम्प्यूटरच्या समोरील कॉम्प्लेक्समधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये जवळपास ३० ते ३५ टीव्ही, प्रोजेक्टर, लॅपटॉप, बारा संगणक यासह इतर साहित्य जळून खाक झाले. दुकानाला आग लागल्यामुळे सात ते आठ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच एमआयएमचे अध्यक्ष अमजद खान व त्यांचे मित्र अशीर्यान अली नवाब, शाकीर शेख, जुनेद शेख, समीर शेख यांच्यासह नगरसेवक साकिब शाह हे देवदूत बनून आले. अग्निशामक विभागाला पाचारण करून आग विझवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आग भडकलेली असतानाच जोरदार हवा असल्याने ही आग पसरण्याची भीती होती. मात्र येथील कार्यकर्त्यांनी वेळीच धावपळ केल्यामुळे आग आटोक्यात आली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :fireआग