शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

वीज पोलमुळे रस्त्याची कामे अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

वणी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेता, नगरपरिषदेने शहरात सिमेंट रस्ता बांधकाम करण्यास सुरूवात केली. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत:च्या अख्त्यारित येणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू केले आहे. शहरातील रस्ते अगोदरच चिंचोळे आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडीही होते.

ठळक मुद्देमहावितरणची चालढकल : मागणी करूनही डिमांड देण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेकडून वणी शहरात सुमारे २० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे केली जात आहेत. मात्र मागणी करूनही रस्ता बांधकामात आडवे येत असलेले विजेचे पोल हटविण्यासाठी वीज वितरण कंपनी सहकार्य करीत नसल्याने रस्ता बांधकामात अनंत अडचणी येत आहेत.वणी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेता, नगरपरिषदेने शहरात सिमेंट रस्ता बांधकाम करण्यास सुरूवात केली. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत:च्या अख्त्यारित येणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू केले आहे. शहरातील रस्ते अगोदरच चिंचोळे आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडीही होते. नव्या रस्ता बांधकामात रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढून नगरपालिकेने रस्ता बांधकामाला सुरूवात केली. परंतु अनेक ठिकाणी विजेचे पोल उभे आहेत. रस्ता बांधकामापूर्वी ते काढण्यात यावे, त्यासाठी जी डिमांड लागेल ती भरण्याची तयारीदेखील नगरपरिषदेने दाखविली. परंतु वीज वितरण कंपनीने नगरपरिषदेला हवा तसा प्रतिसादच दिला नाही. वीज खांब काढले जात नसल्याचे पाहून कंत्राटदारांनी रस्त्याचे बांधकाम केले.यासंदर्भात नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना विचारणा केली असता, रस्ता बांधकाम सुरू करण्यापूर्वी आम्ही वीज खांब रस्त्यातून हटविण्याबाबत वीज वितरण कंपनीला अनेकदा पत्र दिले. परंतु याविषयात वीज वितरण कंपनीने प्रतिसादच दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी नाईलाजाने रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे लागल्याचेही ते म्हणाले.वणी शहरात चिखलगाव ते टिळक चौक, टिळक चौक ते वरोरा मार्गावरील दत्त मंदिर, तहसील चौक ते वरोरा रोड, देशमुखवाडीतील लायन्स इंग्लिश स्कूल ते आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे निवास, बसस्थानक ते रवीनगर या मार्गाचे बांधकाम करण्यात आले. यात अनेक ठिकाणी रस्त्यात पोल उभे आहेत. परिणामी अपघाताची शक्यता आहे.एसपीएम शाळेजवळील राजीव गांधी चौक ते शिवनेरी चौक रस्त्याचे काम पोलमुळे अडून पडले आहे.

टॅग्स :electricityवीज