शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा अपव्यय

By admin | Updated: October 18, 2014 23:02 IST

नागरिकांना एकीकडे भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठ्याला तोड द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे दिवसाही सुरू राहणाऱ्या दिव्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.

दुर्लक्ष : नगरपरिषद व ग्रामपंचायतीही उदासीनयवतमाळ : नागरिकांना एकीकडे भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठ्याला तोड द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे दिवसाही सुरू राहणाऱ्या दिव्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शासनाच्या वीज बचतीच्या आवाहनला विद्युत कंपनी, ग्रामपंचायती आणि नगर पालिकांकडूनच मूठमाती दिली जात आहे. यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिवे दिवसाही सुरू राहतात. गेली कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. एखाद्या खांबावरील दिवा नादुरूस्त झाला तरच तो बंद असतो. याप्रकारात विजेचा अपव्यय होत आहे. शहराच्या काही भागात तासनतासाचे भारनियमन केले जाते. याशिवाय काही भागामध्ये विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असतो. नागरिकांना नियमित विजेला मुकावे लागत असताना होणारा विजेचा अपव्यय संताप निर्माण करणार आहे. लोहारा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या अनेक भागातील पथदिवे कधीच बंद राहत नाही दिवसाही ते प्रकाश देतात. याप्रकाराविषयी संबंधित ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी वीज बचतीविषयी किती दक्ष आहे, हे दिसून येते. यवतमाळ नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या काही भागातही हा प्रकार सुरू आहे. पथदिवे सतत सुरू राहण्याविषयीचा प्रश्न निकाली काढल्या जात नाही हा नागरिकांचा प्रश्न आहे. विजेचे अवास्तव येणारे बिल भरताना वीज ग्राहकांना नाकीनऊ येत आहे. सरासरी बिल पाचवीलाच पुजले आहे. आता नवीन मीटर लावण्याचे काम विद्युत कंपनीने हाती घेतले आहे. यातून वीज बिलांमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे. लोहारा विद्युत कार्यालयांतर्गत येत असलेल्या भागांमध्ये दिवसाही पथदिवे सुरू राहण्याची समस्या मोठी आहे. शिवाय वीज चोरीही कमालीची वाढली आहे. वीज बचतीच्या शासनाच्या आवाहनाला या कार्यालयाकडून कुठलाही थारा नाही. त्यामुळे वरिष्ठांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)