शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणूक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

पुसद तालुक्याच्या वनवार्ला येथील बाबूराव बंडूजी कुबडे आणि महागाव तालुक्याच्या वाकोडी येथील अ‍ॅड. गजेंद्र देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर (क्र.८००४/२०१९) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने २० फेब्रुवारीपूर्वी निवडणूक घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नवे संचालक मंडळ स्थापन करण्याचे निर्देश सहकार आयुक्त पुणे आणि निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालय : २० फेब्रुवारीचा अल्टिमेटमलोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : १२ वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर जुनेच संचालक मंडळ कायम आहे. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत २० फेब्रुवारी २०२० पूर्वी या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी असे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जारी केले आहे.पुसद तालुक्याच्या वनवार्ला येथील बाबूराव बंडूजी कुबडे आणि महागाव तालुक्याच्या वाकोडी येथील अ‍ॅड. गजेंद्र देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर (क्र.८००४/२०१९) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने २० फेब्रुवारीपूर्वी निवडणूक घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नवे संचालक मंडळ स्थापन करण्याचे निर्देश सहकार आयुक्त पुणे आणि निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत. या निवडणुकीस टाळाटाळ केल्यास २० फेब्रुवारीनंतर बँकेवर प्रशासक बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. सत्यजित देसाई व अ‍ॅड. कैलास नरवाडे (नागपूर) यांनी काम पाहिले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ केव्हाच संपला. निवडणुका होईस्तोवर संचालक मंडळ बरखास्त करू नये असे स्पष्ट करीत नागपूर उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगनादेश दिला होता. परंतु सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने हा स्थगनादेश उठवित २० फेब्रुवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश जारी केले. या निर्णयाने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आता लवकरच निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.१४७ जागांच्या नोकरभरतीचे काय ?४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक व शिपायाच्या एकूण १४७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. केवळ त्याची अंतिम निवड यादी जारी करणे बाकी आहे. समांतर आरक्षणाच्या मुद्यावरून ही नोकरभरती कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. या नोकरभरतीमध्ये बरीच ‘उलाढाल’ही झाली. त्यातच आता बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचे आदेश जारी झाल्याने आता या नोकरभरतीचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सर्वोच्च न्यायालयाने २० फेब्रुवारीपूर्वी नवे संचालक मंडळ स्थापन करण्याचे निर्देश सोमवारी जारी केले आहे. आता त्यास टाळाटाळ करता येणार नाही. या निर्देशानुसार लवकरच निवडणुका घेतल्या जाईल.- विजय चव्हाणसंचालक, जिल्हा मध्यवर्तीसहकारी बँक.

टॅग्स :bankबँक