दिल्ली संमेलनातील आणखी आठ संशयित रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:01:00+5:30

२४ तासात १४ कोरोना संशयित ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून यापूर्वी ३९ कोरोना संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी तिघांचा तपासणी अहवाल आला असून तो निगेटीव्ह आहे. या तीनही जणांना मेडिकलच्या विलगीकरण कक्षातून घरी पाठविण्यात आले आहे.

Eight more suspected hospital in Delhi meeting | दिल्ली संमेलनातील आणखी आठ संशयित रुग्णालयात

दिल्ली संमेलनातील आणखी आठ संशयित रुग्णालयात

Next
ठळक मुद्देपोलिसांनी ताब्यात घेतले : तिघांचे अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संशयिताचा आकडा सातत्याने वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता ५६ कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. यवतमाळ शहरातील तायडेनगरातून रविवारी रात्री आठ जणांना तर सोमवारी दुपारी तालुक्यातील सावरगाव येथील दोघांना, महागाव तालुक्यातून चौघांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. २४ तासात १४ कोरोना संशयित ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातून यापूर्वी ३९ कोरोना संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी तिघांचा तपासणी अहवाल आला असून तो निगेटीव्ह आहे. या तीनही जणांना मेडिकलच्या विलगीकरण कक्षातून घरी पाठविण्यात आले आहे.
नव्याने कोरोना संशयित रुग्ण दाखल झाल्याने १२ जणांचे थ्रोट स्वॅब नागपूरला तपासणीकरिता पाठविले आहे. पूर्वीचे ३६ व नव्याने पाठविलेले १२ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सध्या मेडिलकच्या विलगीकरण कक्षात असलेल्या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात येते. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला की नाही हे मात्र थ्रोट स्वॅबच्या तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. गेल्या काही दिवसात शहरासह जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सुदैवाने अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वीच्या तीन रुग्णांवर मेडिकलच्या चमूने यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठविले आहे. हे तीनही व्यक्ती होम क्वारंटाईन आहे.

२०० कोरोना पीपीई किटस् प्राप्त
शासकीय रुग्णालयात कोरोना संसर्ग असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २३० बेडचे स्वतंत्र रुग्णालय उभारले आहे. आता तेथे उपचार करण्यासाठी आवश्यक साधनेही उपलब्ध होत आहे. दोन दिवसापूर्वी नागपूर येथून २०० पीपीई (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्वीपमेंट) किटस् प्राप्त झाल्या आहेत. रुग्णालयातील डॉक्टर व नर्सेस यांना कोरोना संशयितांवर उपचार करताना, त्यांचे थ्रोट स्वॅब घेताना या किटस्चा उपयोग होत आहे. किटस्मध्ये अ‍ॅप्रन, गॉगल, मास्क, ग्लोज्, बुट कव्हर याचा समावेश आहे. सुरक्षित राहून उपचार करता येण्यासाठी या किटस् अत्यावश्यक आहे.

Web Title: Eight more suspected hospital in Delhi meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.