शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईत आर्णीला दिलासा

By admin | Updated: February 29, 2016 02:06 IST

सतत पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देणाऱ्या आर्णीकरांना येत्या उन्हाळ्यात मात्र काहीसा दिलासा मिळणार आहे.

दररोज पाणी : अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडलेआर्णी : सतत पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देणाऱ्या आर्णीकरांना येत्या उन्हाळ्यात मात्र काहीसा दिलासा मिळणार आहे. अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने शहरात दररोज पाणीपुरवठा होण्याची शक्यता वाढली आहे. आर्णी शहरात १६ विहिरी व सात बोअरवेलच्या माध्यमातून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा नसतानाच ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईमध्ये पाणीपुरवठ्याचे काय होणार याची चिंता नगरपरिषदेला सतावत होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन महत्त्वाच्या विहिरी अरुणावती नदीपात्राला लागून आहे. या विहिरींच्या बळावरच जवळपास ५० टक्के शहराला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या विहिरींची पातळी कमी झाल्याने पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली होती. काही भागात तर तब्बल आठ-आठ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात होता. या परिस्थितीवर उपाय म्हणून अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडणे हा पर्याय पुढे आला. त्यामुळे नगरपरिषदेकडून तातडीने अरुणावती प्रकल्पाला पत्र देवून पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली. आरक्षित पाणीसाठा यावर्षी वाढविण्याची विनंतीही पत्रात करण्यात आली. मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता यवतमाळ, पाटबंधारे मंडळ, कार्यकारी अभियंता अरुणावती प्रकल्प दिग्रस यांना २६ फेब्रुवारीला पत्र पाठविले. याची दखल घेत लगेच प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. कोरडे पडलेले अरुणावती नदीचे पात्र सध्या भर उन्हाळ्यात दुथडी भरून वाहात आहे. यामुळे नदीला लागून असलेल्या विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी वाढण्यासाठी फायदा होणार आहे. जनावरांनासुद्धा पाणी मिळण्याची सोय होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नदीपात्र पाण्याने भरलेले पाहून आर्णीकर नागरिक सुखावले आहेत.(शहर प्रतिनिधी)