शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आश्रमशाळा, वसतिगृहांचे दार उघडले, पण विद्यार्थी फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

जिल्ह्यात पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित ६ शासकीय आणि १२ अनुदानित आश्रमशाळा आहेत. तसेच पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित १८ शासकीय आणि २८ अनुदानित आश्रमशाळा आहेत. या सर्व आश्रमशाळांमध्ये एकंदर २१ हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. पण गेल्या आठवडाभरापासून शाळा सुरू होऊनही ते शाळेकडे आले नाहीत. अद्याप दहा टक्के पालकांनीसुद्धा संमतीपत्र दिलेले नाही. 

ठळक मुद्देपालकांची संमतीपत्रे मिळेना : शिक्षक अजूनही खावटीत व्यस्त

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली. पण आठ दिवसांपासून शाळा उघडूनही विद्यार्थी या आश्रमशाळांकडे फिरकलेले नाही. २१ हजार ६७४ पैकी केवळ १४४ विद्यार्थी शाळेत येत असल्याची खंत जिल्ह्यातील दोन्ही प्रकल्प कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली.जिल्ह्यात पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित ६ शासकीय आणि १२ अनुदानित आश्रमशाळा आहेत. तसेच पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित १८ शासकीय आणि २८ अनुदानित आश्रमशाळा आहेत. या सर्व आश्रमशाळांमध्ये एकंदर २१ हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. पण गेल्या आठवडाभरापासून शाळा सुरू होऊनही ते शाळेकडे आले नाहीत. अद्याप दहा टक्के पालकांनीसुद्धा संमतीपत्र दिलेले नाही. अडचणींवर मात करीत पुसद प्रकल्पाने सर्व शाळा उघडल्या. शिक्षकही पाठविले. पण एकही विद्यार्थी शाळेत पोहोचला नाही. पांढरकवडा प्रकल्पातील हिवरी, कापरा, मारेगाव तालुक्यातील बोटोणी, झरी तालुक्यातील मार्थाजुन येथील आश्रमशाळांमध्ये काही विद्यार्थी मात्र येऊ लागलेले आहेत. पण त्यांची संख्या अगदीच नगण्य म्हणजे १४४ एवढीच आहे. आश्रमशाळांचे अनेक शिक्षक अजूनही खावटी अनुदान वाटपाचे सर्वेक्षण करणे, त्यांच्या याद्या करणे याच कामात गुंतलेले आहेत. त्यामुळे साधारणत: पुढील आठवड्यापासून आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी वाढून त्या नियमित सुरू होण्याची आशा आहे.

वसतिगृहांसमोरील अडचणी वसतिगृहांचेही सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. मात्र वसतिगृहातील भोजनाचे ठेके नूतनीकरण करण्याची प्रक्रिया यावेळी लाॅकडाऊनमुळे विलंबाने झाली. काही ठिकाणी जुन्याच कंत्राटदारांना काम देण्यात आले आहे. परंतु, कोरोना काळात अत्यंत काटेकोर नियम पाळून भोजन शिजविताना कंत्राटदारांना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. प्रत्यक्षात विद्यार्थीच वसतिगृहात येत नसल्याने या कंत्राटदारांना तरी नुसते पैसे कसे द्यावे हा प्रशासनापुढे पेच आहे. 

आश्रमशाळांसमोरही अनेक समस्या काही आश्रमशाळा कोरोना संशयितांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. त्या आता मोकळ्या करून सॅनिटाइज करण्यात आल्या आहेत. परंतु, मुख्य अडचण आहे ती पालकांचे संमतीपत्र मिळविण्याची. अनेक पालकांच्या मनात अद्यापही धास्ती असल्याने त्यांच्याकडून संमतीपत्रच आलेले नाही. त्यामुळे शाळाही सुरू होऊ शकलेल्या नाहीत.  

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या