नेर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:07+5:30

व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सात दिवसांचा बंद ठेवला, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या सुविधेकरिता अत्यावश्यक वस्तूंच्या सेवेची दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना केल्या. येथील क्वारंटाईने सेंटरमध्ये ९४ रुग्ण आहे. या सेंटरची साफसफाई आणि येथे असलेल्या नागरिकांच्या जेवणाकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही केल्या.

Don't let the citizens of Ner city be inconvenienced | नेर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका

नेर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह नेर येथे पाहणी, परिस्थितीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रशासनाने शहरातील काही भाग प्रतिबंधित घोषित केला. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
येथील नवाबपुरा या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, श्रीकांत देशपांडे, इब्राहीम चौधरी आदी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सात दिवसांचा बंद ठेवला, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या सुविधेकरिता अत्यावश्यक वस्तूंच्या सेवेची दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना केल्या. येथील क्वारंटाईने सेंटरमध्ये ९४ रुग्ण आहे. या सेंटरची साफसफाई आणि येथे असलेल्या नागरिकांच्या जेवणाकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही केल्या.
बैठकीप्रसंगी तहसीलदार अमोल पोवार, मुख्याधिकारी नीलेश जाधव, बीडीओ युवराज मेहत्रे, डॉ.रवींद्र दुर्गे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, मनोज नाल्हे, दीपक आडे, भाऊराव ढवळे, प्रवीण राठोड आदी उपस्थित होते.

दारव्हा ग्रामीण रुग्णालयालाही दिली भेट
दारव्हा येथे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी शहरातील शिवाजीनगर या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे कोव्हीड - १९ बाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर यांच्यासह स्थानिक अधिकारी आदी उपस्थित होते.

उपाययोजनांवर पीपीटीद्वारे सादरीकरण
नेर येथे विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्राबाबत तसेच कोरोना संदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले. नेर येथे ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Don't let the citizens of Ner city be inconvenienced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.