शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीला विरोध नाही, गैरवापर टाळावा

By admin | Updated: September 14, 2016 01:16 IST

मराठा-कुणबी समाजाचा २५ सप्टेंबर रोजी यवतमाळात मूक क्रांती मोर्चा आयोजित असून त्याच्या तयारीसाठी मंगळवारी येथील संदीप मंगलम्मध्ये पार पडलेल्या

मूक मोर्चा : मराठा-कुणबी बैठकीतील सूर
यवतमाळ : मराठा-कुणबी समाजाचा २५ सप्टेंबर रोजी यवतमाळात मूक क्रांती मोर्चा आयोजित असून त्याच्या तयारीसाठी मंगळवारी येथील संदीप मंगलम्मध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला आमचा विरोध नाही, त्यातील गैरवापर टाळावा एवढीच अपेक्षा असल्याचा सूर यावेळी उमटला.
या बैठकीमध्ये समाजाच्यावतीने अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी मान्यवरांची भाषणेही झाली. समाजाच्या मागण्यांवरही चर्चा झाली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला विरोध नसून त्याचा गैरवापर टाळावा, कोपर्डी च्या घटनेतील नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागण्या मूक मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.
या बैठकीत नंदकुमार बुटे, प्रा. संध्या रावते आणि प्रिया गायकवाड आदींनी मोर्चाची भूमिका विशद केली. बैठकीत सर्वप्रथम कोपर्डी घटनेतील मृत श्रध्दाला सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीत प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. प्रचार व प्रसाराचे साहित्य वितरित करण्यात आले. प्रत्येकाने मोर्चात सहकुटुंब सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवरायाची शिकवण अनुसरूनच मोर्चा काढण्यात येणार आहे. मूक मोर्चा असल्याने कोणीही नारे देऊ नये, कोणीही स्वत: तयार केलेले बॅनर वापरू नयेत, संस्था, संघटनेचे बॅनर वापरता येणार नाही, असे सुध्दा आयोजन समितीने यावेळी स्पष्ट केले.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची प्रत्येकाचे दक्षता घ्यावी, इतकेच नव्हे तर मोर्चानंतर झालेला कचराही स्वत:च साफ करायचा निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीत प्रा. प्रवीण देशमुख यांचे ह्यदयस्पर्शी व्याख्यान झाले. (कार्यालय प्रतिनिधी)

बैठकांचे वेळापत्रक
मोर्चाच्या आयोजनासाठी प्रत्येक तालुक्यात बैठक होणार आहे. १६ सप्टेंबरला महागव, उमरखेड, पुसद, १७ सप्टेंबरला राळेगाव, कळंब, बाभुळगाव, १८ ला मुकुटबन, मारेगाव, वणी, १९ ला नेर, दारव्हा, दिग्रस, २० ला आर्णी, घाटंजी आणि पांढरकवडा येथे बैठक होणार आहे.