शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा अंत पाहू नका

By admin | Updated: February 29, 2016 02:04 IST

अधिकारी, कर्मचारी व राज्यकत्यांनी स्वत:ची स्वार्थी प्रवृत्ती बाजुला सारून जनतेचे जीवनमरणाचे प्रश्न सोडवा, ..

एच.एम. देसरडा : पुसद येथे बळीराजा चेतना अभियानात मार्गदर्शन पुसद : अधिकारी, कर्मचारी व राज्यकत्यांनी स्वत:ची स्वार्थी प्रवृत्ती बाजुला सारून जनतेचे जीवनमरणाचे प्रश्न सोडवा, अन्यथा आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलनाचे उपाध्यक्ष, अर्थतज्ज्ञ प्रा.एच.एम. देसरडा यांनी शनिवारी येथे दिला. येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठन, वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा चेतना अभियान अंतर्गत ‘सहभाग वाढवा, दुष्काळ हटेल’, ‘शेती, पाणी, रोजगार’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषीभूषण दीपक आसेगावकर होते. कार्यक्रमाला अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपविभागीय अधिकारी कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी पी.एम. राठोड, अ‍ॅड. आप्पाराव मैंद, प्राचार्य डॉ. गणेश पाटील उपस्थित होते. प्रा. देसरडा म्हणाले, विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ आहे. मात्र अनेकांना शेतकऱ्यांच्या समस्या व दुष्काळाशी कहीही देणे-घेणे नाही. शासनकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे ही दुष्काळी परिस्थिती वाढत आहे. पाऊस एखाद्या वेळी धोका देतो मात्र जनतेला लुबाडणारे अधिकारी, कर्मचारी, नेते, व्यापारी दररोजच धोका देत असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाचा अभ्यास करताना जवळपास १० वर्र्षे खेडेगावात शेती केली. त्यामुळे शेती आणि दुष्काळ जवळून अभ्यासता आला. त्याचाच परिणाम म्हणून राज्य आणि देशाच्या विविध कमिट्यावर काम करता आले तर समाजाच्या प्रत्येक घटकाला पाहता आले. माणूस हा निसर्गाशी वैर करून जगू शकत नाही पण काहींनी निसर्गाशी ऐशीतैशी केली आहे. निसर्ग गरजा पूर्ण करतो पण हाव पूर्ण करत नाही. दुष्काळाच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून पाठपुराव केला होता. आजच्या राजकारण्यांकडे याचा अभाव असून, लोकप्रतिनिधी कुठेच जात नासल्याचे खंत व्यक्त केली. संचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. (प्रतिनिधी)