शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान धर्मात गुंडाळू नका

By admin | Updated: September 22, 2014 23:34 IST

बुद्ध क्रांतिकारी होते, ते धार्मिक तर मुळीच नव्हते. बुद्धाचे तत्त्वज्ञान धर्मात गुंडाळू नका, डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीचे बोट धरून जीवनाची वाटचाल करा, तुमच्या संघर्षाची बखर लिहून काढा, तरच पुढच्या

यशवंत मनोहर यांचा सत्कार : बुद्धिस्ट पेन्शनर्स सोशियल असोसिएशनची सभायवतमाळ : बुद्ध क्रांतिकारी होते, ते धार्मिक तर मुळीच नव्हते. बुद्धाचे तत्त्वज्ञान धर्मात गुंडाळू नका, डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीचे बोट धरून जीवनाची वाटचाल करा, तुमच्या संघर्षाची बखर लिहून काढा, तरच पुढच्या पिढ्यांना तुमचा संघर्ष कळेल. डॉ.बाबासाहेबांना डोक्यावर घेवून नाचू नका तर डोक्यात घ्या, असे विचार आंबेडकरी विचारवंत व ज्येष्ठ कवी डॉ.यशवंत मनोहर यांनी मांडले. दि बुद्धिस्ट पेन्शनर्स सोशियल असोसिएशनच्या शनिवारी आयोजित सभेनंतर जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणाधिकारी व्ही.पी. पाटील अध्यक्षस्थानी होते. असोसिएशन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक संघटनेतर्फे डॉ.मनोहर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सन्मानपत्राचे लेखन व वाचन डॉ.सागर जाधव यांनी केले. असोसिएशनचे सचिव रवींद्र टेंभुर्णे, उपाध्यक्ष के.पी. कांबळे, एस.एल. वनकर, सहसचिव रामदास नाईक, कोषाध्यक्ष ए.जी. कांबळे, बी.ए. पाढेन, सुगंधाताई मस्के, प्राध्यापक संघटनेचे प्रा.अरुण फुलझेले, प्रा.डॉ.अशोक कांबळे, प्रा.डॉ.सागर जाधव, प्रा.प्रवीण इंगळे, प्रा.डॉ.भीमराव ठोंबरे, अ‍ॅड.सोपानराव कांबळे, अ‍ॅड.गोविंद बनसोड, योगानंद टेंभुर्णे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रा.डॉ.सागर जाधव, प्रा.डॉ.सुनंदा वालदे, प्रा.डॉ.चंद्रकांत सरदार, प्रा.डॉ.रमेश खंडारे, डॉ.सुदर्शन कांबळे, अ‍ॅड.अरुण मोहोड, घाटंजीच्या नगराध्यक्ष चंद्ररेखा रामटेके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. क़वि. नगराळे यांच्यासह इतर चार पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. कार्यक्रमासाठी के.टी. भगत, तुकाराम मेश्राम आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)