शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

शिस्तबद्ध जीवन हेच सुखाचे साधन

By admin | Updated: November 14, 2016 01:37 IST

सेवा, समर्पण आणि सहकार्याची भावना अगदी पुरातन काळापासून मानवी मनात वसत आली आहे.

जीवन देशमुख : निवृत्त अभियंता मित्र मंडळाची व्याख्यानमालायवतमाळ : सेवा, समर्पण आणि सहकार्याची भावना अगदी पुरातन काळापासून मानवी मनात वसत आली आहे. अगोदरच्या काळात या भावनांचे प्रकटीकरण मानवाकडून मोठ्या प्रमाणात व्हायचे. परंतु आज या भावना फारशा प्रकट होताना दिसत नाही. कारण आपण आपली जीवनशैली झपाट्याने बदलायला लागलो आहोत. परंतु शिस्तबद्ध जीवन हेच सुखाचे साधन आहे, ही गोष्ट आपण विसरता कामा नये, असे उद्गार जीवन देशमुख यांनी काढले. निवृत्त अभियंता मित्र मंडळाद्वारे येथे आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ‘हसत खेळत तणावमुक्त जीवन’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, वेदना हृदयात सांभाळता आल्या असत्या तर नेत्रात अश्रू आलेच नसते. अश्रूंद्वारे वेदना बाहेर पडतात आणि आपण तणावमुक्त होतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ‘जिंदगी का नाम कभी खुशी गभी गम है’ ही गोष्ट आपणास स्वीकारता आली पाहिजे. शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि निसर्गानुकुल दिनचर्या यावर आपण लक्ष केंद्रीत करू शकलो तर हसत खेळत तणावमुक्त जीवन जगणे मानवास सहज शक्य आहे. परमेश्वराने सर्वांनाच बुद्धी दिलेली आहे. त्याचा योग्य वापर करता आला तर जीवनातील उदासीनता, निराशा दूर होवून हसत-खेळत तणावमुक्त जीवन सहजपणे जगता येते, असे ते म्हणाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव भास्करवार होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसुधा पांडे यांनी स्वागतगीत सादर केले. माजी खासदार राजाभाऊ ठाकरे यांच्या हस्ते जीवन देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय किशोर इंगळे यांनी करून दिला. संचालन वसंत पांडे यांनी केले. उत्तम राठोड यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)