शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षा योजनेत कृषी अवजारांची थेट खरेदी

By admin | Updated: August 28, 2015 02:33 IST

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे.

यवतमाळ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे. यासाठी यांत्रिकीकरणाची मदत घेतली जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने अनुदानावर अवजारे देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी अवजारे कृषी विभागातून खरेदी करावी लागत होती. आता ही अवजारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेतून खरेदी करता येणार असल्याने गैरप्रकाराला आळा बसणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या हातात आधुनिक कृषी अवजारे सोपविली जाणार आहेत. ही कृषी अवजारे महाग आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्या बाहेर आहेत. त्यामुळे कृषी अवजारे अनुदानावर वितरीत होणार आहे. पूर्वी ही अवजारे निकृष्ट असल्याचा आरोपही झाला आहे. यावर मात करण्यासोबत दर्जेदार वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून केंद्र सरकारने नवा आदेश काढला आहे. यामध्ये यांत्रिकीकरणातील साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुभा राहणार आहे. त्यामुळे दर्जेदार वस्तू शेतकऱ्यांच्या हातात पडतील. कृषी विभागाकडून झालेल्या तपासणी नंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबतचे आदेश कृषी संचालक के.व्ही. देशमुख यांनी काढले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून कोणते साहित्य खरेदी करायचे, किमत काय असेल याबाबतच्या सूचना मिळायच्या आहेत. मात्र अदेशानुसार साहित्याची खरेदी करण्याचा मार्ग खूला झाला आहे. योजनेतील गैरप्रकार टळण्यास मदत होणार आहे. (शहर वार्ताहर)