शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे धम्म परिषद

By admin | Updated: January 15, 2017 01:09 IST

महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व्हावा

विविध कार्यक्रम : बौद्ध धम्मदीक्षा घेणाऱ्यांचा सत्कार दारव्हा : महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी येथे चौथी धम्म परिषद घेण्यात आली. या निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याबद्दल सचिन मुधोळकर, दीपाली मुधोळकर, सार्थक मुधोळकर यांचा सत्कार करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळ दारव्हा व बाळासाहेब घुईखेडकर फाऊंडेशन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेण्यात आली. उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उत्तमराव शेळके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. वासुदेव भगत, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रमेश इंगोले, भन्ते बी. संघपाल, भन्ते कश्यप, भन्ते आनंद तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ख्वाजा बेग, आमदार प्रकाश गजभिये, अ‍ॅड. शंकरराव राठोड, अनुताई गडपायले, सुभाष ठोकळ, डॉ. संगीता घुईखेडकर, प्राचार्य विलास राऊत, शिवरामजी कटके, बाळासाहेब सोनोने, स्वागताध्यक्ष वसंत घुईखेडकर आदी उपस्थित होते. यावेळी भन्ते बी.संघपाल यांनी वारकरी संप्रदायातील संत तुकाराम यांच्या विचाराचे संदर्भ देऊन तथागत गौतम बुद्धांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. आमदार ख्वाजा बेग, आमदार प्रकाश गजभिये यांनीही विचार व्यक्त केले. स्वागताध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी दरवर्षी धम्म परिषदेचे आयोजन करण्याची घोषणा यावेळी केली. सायंकाळी बापूराव रंगारी लिखित व माणिकराव ढोरे दिग्दर्शित ‘क्षमा कर पुन्हा ये’ हे दोन अंकी नाटक सादर केले. कार्यक्रमाला प्रकाश घरडे, गणेश म्हातारमारे, नामदेवराव खोब्रागडे, ए.एच. जुमळे, प्रा. सिद्धार्थ गायकवाड, सुधाकर तायडे, वसंतराव पाटील, आर.के. कांबळे, पुंडलिक शेंडे, जयकृष्ण बोरकर, शरद माहुरे, मेघनाथ भगत, वसंत मनवर, मधुकर मुधाणे आदी उपस्थित होते. संचालन प्रा. प्रशांत बागेश्वर, खुशाल ढवळे, प्रा. अजाबराव खंडारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. अरविंद मनवर, प्रा. गौतम मनवर, प्रा. भागवत, प्रा. बोरकर, प्रा. घोडेस्वार, सुधीर सोनोने, विजय गजभिये, राजू मनवर, सुनील अगमे, भीमराव राऊत, गौतम भगत, मिलिंद आठवले, अंकुश पेठे, अंकुश वरठी, सुयोग पाटील, अश्विन कांबळे, भाऊ डोंगरे, सुरज तायडे, प्राची डेरे, अस्मिता डेरे, जयश्री खडसे, राणी निचळे आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)