शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मारूतीच्या चरणी त्यागला भक्ताने प्राण

By admin | Updated: August 17, 2014 23:24 IST

मृत्यू हा अटळ आहे. तो केव्हा आणि कधी कुणाला गाठेल हे सांगता येत नाही. आयुष्यभर मारुतीची पूजा-अर्चा करणाऱ्या एका भक्ताचा मृत्यू मारूतीच्या चरणी झाला. मांगलादेवी येथील मंदिरात पूजा

मांगलादेवीची घटना : मुलींनी दिला खांदा आणि चितेला भडाग्नीविनोद कापसे - मांगलादेवीमृत्यू हा अटळ आहे. तो केव्हा आणि कधी कुणाला गाठेल हे सांगता येत नाही. आयुष्यभर मारुतीची पूजा-अर्चा करणाऱ्या एका भक्ताचा मृत्यू मारूतीच्या चरणी झाला. मांगलादेवी येथील मंदिरात पूजा करताना भोवळ आली आणि मारुतीच्याच चरणी प्राण त्यागला. हा योगायोग अनेकांना चटका लावून गेला तर मुलींनी आपल्या वडिलांच्या तिरडीला खांदा देऊन भडाग्नीही दिला. रमेश कुंभारखाने असे त्या मारूती भक्ताचे नाव आहे. ग्रामसेवक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कुंभारखाने यांची मारूतीवर प्रचंड श्रद्धा. दररोज हनुमान मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करायचे. या पूजाअर्चेत कधीही खंंड पडला नाही. शनिवारी नेहमी प्रमाणे ते हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी गेले. मात्र मंदिरात जाताच त्यांना भोवळ आली, खाली कोसळले. काही कळायच्या आतच त्यांनी देहत्यागला. मारूतीच्या चरणी प्राण त्यागल्याची माहिती गावात पसरली. अनेकांनी या मंदिराकडे धाव घेतली. मारूती भक्ताचा मारूतीच्या चरणी मृत्यू व्हावा हा योगायोग अनेकांना चटका लावून गेला. रमेश कुंभारखाने यांना चार मुलीच. मुलगा-मुलगी असा त्यांनी कधी भेद केला नाही. मुला प्रमाणेच चारही मुलींना वाढविले. तीन मुलींचे लग्न लावून दिले. सर्व काही व्यवस्थित असताना नियतीने डाव साधला. रमेशराव यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मुलींनी आपल्या वडिलांना मुलांची कमतरता जाणवू दिली नाही. मुलगी शैलेजा विनोद फोपसे (माणिकवाडा), अनुजा प्रमोद काळे (अलीपूर), उमा अतुल खकाळे (धामणगाव) आणि पूनम रमेश कुंभारखाने (मांगलादेवी) या चौघी बहिणींनी वडिलांच्या तिरडीला खांदा दिला. स्मशानभूमीत पूनम या छोट्या मुलीने चितेला भडाग्नी दिली. त्या ठिकाणी उपस्थित प्रत्येक जण हळहळत होता. मात्र या घटनेतून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश मिळाला.