शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणवाडा परिसरातील गावांत डेंग्यूसदृश आजाराचे थैमान

By admin | Updated: October 18, 2014 23:01 IST

तालुक्यातील ब्राह्मणवाडा, वाळकी, माणिकवाडा या तिन्ही गावात डेंग्यूसदृश आजाराने कहर केला असून अनेक रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेर : तालुक्यातील ब्राह्मणवाडा, वाळकी, माणिकवाडा या तिन्ही गावात डेंग्यूसदृश आजाराने कहर केला असून अनेक रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच ब्राह्मणवाडा येथील ३० वर्षीय महिलेचा डेंग्यूसदृश आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र अद्याप डेंग्यूसदृश आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले नाही.तालुक्यातील ब्राह्मणवाडा (पूर्व) या गावाला हागणदारीमुक्ती निर्मल ग्राम योजना, हरियाली योजना व तंटामुक्त पुरस्कार मिळाला. प्रत्यक्षात या गावाची स्थिती दयनीय असून अस्वच्छतेचा साम्राज्य आहे. जागोजागी अस्वच्छ पाण्याचे डबके साचले असून ज्या विहिरीतून नळयोजनेला पाणीपुरवठा होतो त्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नाही. भारनियमनाचे व कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याचे कारण सांगत टाकीत साठवून ठेवलेले पाणी गावकऱ्यांना प्यावे लागते. पाण्याच्या टाकीत कचरा साचला असून ग्रा.पं.ने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. एवढे पुरस्कार मिळूनही सदर गाव विकासापासून कोसो दूर असून स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहे. गावातील दुर्गा अमृत चर्जन (३०) हिला काही दिवसांपूर्वी डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले होते. यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तिला नऊ महिन्याचे बाळ असून मातेच्या निधनामुळे सदर बालक पोरके झाले. अत्यंत शोकाकूल वातावरणात दुर्गा चर्जन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्राह्मणवाडा येथील मनोज संतोष जाधव (६), प्रणय संजय कांबळे (१०), तेजस संजय कांबळे (१२), विनोद भीमराव राठोड (५) रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच माणिकवाडा येथेही ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे पाणी पुरवठा सदोष असल्याने आशिष अविनाश रामटेके (९) व इतर अनेकांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले आहे. परिसरातील अनेक गावांवर डेंग्यूसदृश आजाराने कहर केला असून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. मात्र या आजाराने तालुक्यातील नागरिक भयभीत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. असे असले तरी अद्याप आजार नियंत्रणात आरोग्य यंत्रणेला यश आले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)