शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या पुनर्सर्वेक्षणाची मागणी

By admin | Updated: May 14, 2014 02:07 IST

यंदाचा रबी हंगाम गारपिटीमुळे पूर्णत: नष्ट झाला. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामात तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

यवतमाळ : यंदाचा रबी हंगाम गारपिटीमुळे पूर्णत: नष्ट झाला. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामात तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वादळ व गारपिटीमुळे गहू, हरभरा, ओलिताची कपाशी, संत्रा, मोसंबी, लिंबू, पपई, आंबा या फळबागांचे नुकसान झाले. गारपिटग्रस्तांच्या सर्वेक्षणामध्ये मोठय़ा प्रमाणात चालढकल करण्यात आली असून गारपिटग्रस्तांचे पुनर्सर्वेक्षण करावे या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.गारपीटग्रस्तांची विवंचना लक्षात घेऊन शासनाने आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला. मात्र नुकसानीचे सर्वेक्षण करताना निम्नस्तरीय शासकीय यंत्रणेने मोठय़ा प्रमाणात चालढकल केली. गारपीट झालेल्या क्षेत्रातील काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. तर काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षणच केले नाही. गारपिट झाली तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ओलिताची कपाशी होती. परंतु कापूस या पिकाच्या नुकसानीची भरपाई द्यायची नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे. गहू, हरभरा, फळबागांच्या नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली. सर्वेक्षणापेक्षा जादा प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची पैसेवारी ५0 टक्क्यांपेक्षा कमी असताना शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती मिळालेल्या नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये गारपीट व वादळग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात यावे, गारपीटग्रस्तांना वाढीव अर्थसहाय्य देण्यात यावे, ओलिताच्या कपाशीचा विचार व्हावा, दुष्काळीस्थितीत मिळणार्‍या सवलती देण्यात याव्या, शेतकऱ्यांकडील बँक कर्जाचे पुनर्गठण करण्यात यावे आदी मागण्या ठेवण्यात आल्या होत्या.यावेळी खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड, माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार, विश्‍वास नांदेकर, नामदेव खोब्रागडे, माया राणे, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, श्रीधर मोहोड, पवन जयस्वाल, बाबू पाटील जैत, शैलेश ठाकूर, हरिहर लिंगनवार, विनोद जयसिंगपुरे, महेश नाईक, भाऊराव ढवळे, गजानन बेजंकिवार, गजानन भोकरे, अभय व्यास, अतुल गुल्हाने यांच्यासह शिवसैनिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)