शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकले हात राबतात धोकादायक व्यवसायात

By admin | Updated: November 4, 2016 02:11 IST

तालुक्यात अनेक चिमुकले हात विविध ठिकाणी धोकादायक कामांवर राबताना दिसत आहे. विटभट्ट्यासह ऊसतोडणीच्या ठिकाणी आई-वडिलांसोबत चिमुकले काम करताना दिसतात.

नियमांचे उल्लंघन : कामगार अधिकारी कार्यालयाचे जाणीवपूर्वक दुर्लक्षप्रकाश सातघरे  दिग्रसतालुक्यात अनेक चिमुकले हात विविध ठिकाणी धोकादायक कामांवर राबताना दिसत आहे. विटभट्ट्यासह ऊसतोडणीच्या ठिकाणी आई-वडिलांसोबत चिमुकले काम करताना दिसतात. बालमजूरांना कामावर राबविणे गुन्हा असतानाही हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे. १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात कामाला ठेवणे, त्यांच्याकडून काम करून घेणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र दिग्रस शहरात सर्रास बाल कामगारांकडून लहानमोठी कामे करवून घेतली जात आहे. लहान मुले काम करताना दिसत असताना कोणतीही कारवाई मात्र केली जात नाही. शहरातील हॉटेल, चहा टपऱ्या, कापड दुकान, किराणा दुकान, पाणीपुरी स्टॉल यासह अनेक ठिकाणी बालमजूर राबत आहे. एवढेच नव्हे तर वीटभट्ट्यांवरही बालमजूर आई-वडिलांसोबत राबताना दिसत आहे. गारा तुडविणे यासह ओल्या विटा वाहून नेणे आदी कामे ही मुले करताना दिसून येतात.अनेक दुकानात येथे बालकामगार राबत नाही, असे फलक लावलेले असतात. मात्र त्याच दुकानात लहान मुले काम करताना दिसून येतात. बालवयात त्यांच्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. हॉटेल, बारमध्ये ग्राहकांकडून अपशब्द त्यांना ऐकावे लागतात. यातून त्यांची मानसिकता खच्चीकरण होण्याची शक्यता असते. अनेकदा या मुलांना पेलवणार नाही, अशी कामे सक्तीने करवून घेतली जातात. मोठ्या व्यक्तीला अधिक पैसे द्यावे लागते. तो मन लावून काम करेल याची कोणतीही खात्री नसते त्यामुळे दुकानांमध्ये लहान मुलांनाच पसंती दिली जाते. चहाच्या दुकानात तर हमखास बालकामगार राबताना दिसून येतात. बालमजूरी थांबविण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत असले तरी यश मात्र येत नाही. परिणामी चिमुकले धोकादायक व्यवसायात राबताना दिसत आहे.