शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल बँकेत जागेअभावी ग्राहकांचे हाल

By admin | Updated: August 19, 2015 02:48 IST

शहरातील अग्रणी सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेत कमी जागेमुळे बँकेत येणाऱ्या खातेदारांचे प्रचंड हाल होत आहे.

मारेगाव : शहरातील अग्रणी सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेत कमी जागेमुळे बँकेत येणाऱ्या खातेदारांचे प्रचंड हाल होत आहे.शहरात गेल्या ३० वर्षांपूर्वी राष्ट्रीयीकृत सेंट्रल बँकेची शाखा उघडण्यात आली. या राष्ट्रीयीकृत बँकेत हजारो ग्राहकांसह शासनाच्या सर्व विभागांचे खाते आहे. दररोज या शाखेमार्फत लाखोंची उलाढाल होत असते. गेल्या ३० वर्षांपासून या बँकेचे कामकाज भाड्याच्या प्रशस्त इमारतीत सुरू होते. ग्राहकांना या बँकेतून उत्तम सेवा मिळत होती. मात्र ही इमारत दुरूस्तीला आल्याने या बँकेचे स्थानांतरण यवतमाळ-वणी रस्त्यावरील दुसऱ्या कमी विस्ताराच्या भाड्याच्या इमारतीत करण्यात आले आहे. तेथे कमी जागेमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.या बँकेत शेतकरी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने बँकेत ग्राहकांना उभे राहण्यासाठी जागा कमी पडत आहे. सदर इमारत मोठी असताना माजी बँक व्यवस्थापकांनी अर्धीच जागा २० वर्षांच्या करारावर भाड्याने घेऊन कमी जागेत बँक थाटली. सुमारे १५ बाय ६० च्या लांब जागेत बँकेचा पसारा आहे. तेथे एकच काऊंटर आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्याचा सर्वाधिक फटका वृद्ध, निराधार, पेन्शनधारक व विद्यार्थ्यांसह इतर ग्राहकांना सहन करावा लागतो. या प्रकाराने ग्राहकांचा वेळ, श्रम यांचा अपव्यय होत आहे. त्यामुळे बँकेच्या खातेदारांकडून संताप व्यक्त होत आहे. ग्राहकांना त्यांच्या व्यवहारासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. अपुऱ्या जागेमुळे धड रांगही लावता येत नाही. या बँकेतील ग्राहकांची संख्या शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्याच्या ठिकाणी सर्वप्रथम ही बँक सुरू झाल्याने अनेकांनी या बँकेत खाते उघडले आहे. त्यामुळे आता खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांना इतर कामासाठी गेल्यावर बँकेतील अपुऱ्या जागेचा त्रास सहन करावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)