शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वणी उपविभागात पिकांचे नुकसान लाखो रुपयांचे, मदत मात्र हजारांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करीत असल्याने मेटाकुटीस आला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वणी तालुक्यात ३४ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील ७ महसूल मंडळांत अतिवृष्टी, तर शिंदोला व पुनवट मंडळांतील पिकांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तयार केला. शुक्रवारी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी २३ कोटी २६ लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पीक बुडाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र आता हेक्टरी केवळ ६ हजार ८०० रुपये देण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करीत असल्याने मेटाकुटीस आला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वणी तालुक्यात ३४ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील ७ महसूल मंडळांत अतिवृष्टी, तर शिंदोला व पुनवट मंडळांतील पिकांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तयार केला. शुक्रवारी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी २३ कोटी २६ लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे. यंदा सप्टेंबर महिन्याअगोदर पिकांची स्थिती अतिशय चांगली होती. मात्र त्यानंतर आलेल्या पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. वणी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणीही विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत करावी, अशा मागणीचे निवेदनही प्रशासन व शासनाला देण्यात आले. मात्र ही मागणी अव्हेरून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत शासनाकडून दिली जाणार आहे. या अल्प मोबदल्यात आम्ही जगावे कसे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

बोंडसडीनंतर कपाशीवर आता लाल्याचा प्रकोप- सततच्या पावसाने कपाशीची बोंडे सडली, तर सोयाबीनला अंकुर फुटले. या संकटातून शेतकरी सावरत नाही, तोच आता उरल्यासुरल्या कपाशीवर हळूहळू लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हादरून गेला आहे. यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती