शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षासह दहा जणांवर गुन्हा

By admin | Updated: May 27, 2014 01:09 IST

अतिक्रमण करून लावलेल्या टपरीसमोर दुचाकी ठेवून अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा सुरळीत करण्यास गेलेल्या उपसरपंचासह १० गावकर्‍यांशी वाद घालून टपरी

हिवरी : अतिक्रमण करून लावलेल्या टपरीसमोर दुचाकी ठेवून अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा सुरळीत करण्यास गेलेल्या उपसरपंचासह १० गावकर्‍यांशी वाद घालून टपरी चालकाने त्यांना शिवीगाळ केली. त्यात धक्काबुक्की झाल्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. आर्णी मार्गावरील मनदेव येथे रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता सरपंच, उपसरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षासह दहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला. सरपंच अनिल कोंडबाजी पारधी, उपसरपंच सुरेश भीमराव फुपरे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू तुळशीराम तडसे, विष्णू नारायण फुपरे, विश्वंभर नारायण मीरासे, दिनेश विश्वनाथ पारधी, पुंडलीक विठोबा महाजन, संतोष देवराव हगवने, मंगेश नरहरी वाघमारे सर्व रा. मनपूर आणि मारोती महादेव अमरे रा. अर्जुना अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहे. दिगंबर महादेव राठोड रा. सेंदूरसनी, असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. दिगंबरचा मेव्हणा सोपान जाधव रा. बोथबोडन याने मनदेव येथे अतिक्रमित जागेवर टपरी थाटली आहे. रविवारी रात्री टपरीसमोर वाहने ठेवून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याची माहिती मिळताच सरपंच पारधी, उपसरपंच फुपरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तडसे हे गावकर्‍यांसह तेथे गेले. यावेळी त्यांनी टपरी चालक सोपानची समजूत घालून वाहतूक अडथळा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र सोपानने काहीएक ऐकून न घेता त्यांनाच दिगंबरच्या मदतीने शिवीगाळ केली. तसेच त्यांच्याशी झटापट केली. त्यानंतर दिगंबरने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता या प्रकरणात गावकर्‍यांवरच मारहाण आणि टपरीतील साहित्याची नासधूस केल्याचा गुन्हा नोंदविला. तसेच गावकरी ज्या वाहनातून तेथे आले होते ते वाहनही जप्त केल्याचा आरोप गावकर्‍यांकडून केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे. (वार्ताहर)