शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासकीय संकलन केंद्रावर खरेदी झालेला शेतमाल ठेवण्यासाठी धामणगावचे गोदाम उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी खरेदी झालेला शेतमाल ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्देपेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत : नाफेडच्या नियमानुसार गोदामात शेतमाल पोहोचल्यावरच प्रश्न सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेरण्या तोंडावर असताना कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले आहेत. अशा स्थितीत पेरणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ चुकारे मिळावे याकरिता संपूर्ण शेतमाल गोदामात हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासकीय संकलन केंद्रावर खरेदी झालेला शेतमाल ठेवण्यासाठी धामणगावचे गोदाम उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी खरेदी झालेला शेतमाल ठेवला जाणार आहे. यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्याचे पैसे वळते होणार आहेत.जिल्हा प्रशासनाला खरेदीकरिता उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हरभऱ्याकरिता ५० हजार क्विंटचले उद्दिष्ट होते. शासकीय केंद्रावर ५६ हजार क्ंिवटल हरभऱ्याची खरेदी झाली. निर्धारित उद्दिष्टाच्या १२० टक्के हरभऱ्याची अधिक खरेदी करण्यात आली. जिल्ह्याला दीड लाख क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात एक लाख ४७ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.यानंतरही तूर आणि हरभऱ्याची नोंदणी करणारे ४२ हजार शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये १२ हजार हरभरा उत्पादक आणि ३० हजार तूर उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.या शेतकऱ्यांनाही आपल्या शेतमालाची विक्री हमी कें द्रावर करायची आहे.२१ हजार शेतकऱ्यांकडे साडेचार लाख क्विंटल कापूसजिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांकडे साडेचार लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे. या शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कापसाची विक्री करायची आहे. प्रत्यक्षात केंद्रामध्ये जागाच शिल्लक नाही. यामुळे खरेदीला विलंब लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील शेतकºयांचा कापूस शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हीसीमध्ये तशी ग्वाही दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती