शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, सोयाबीनच्या पीक कर्ज दरात वाढ

By admin | Updated: May 23, 2014 00:14 IST

जिल्हाभरातील शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या कापूस, सोयाबीन या पीक कर्जाच्या दरात हेक्टरी दोन हजार रुपये वाढ प्रस्तावित आहे. त्यावर शुक्रवारी २३ मे रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी

 यवतमाळ : जिल्हाभरातील शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या कापूस, सोयाबीन या पीक कर्जाच्या दरात हेक्टरी दोन हजार रुपये वाढ प्रस्तावित आहे. त्यावर शुक्रवारी २३ मे रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत निर्णय होणार आहे. कापसाला सध्या हेक्टरी ३० हजार तर सोयाबीनला २० हजार रुपये पीक कर्ज दिले जाते. त्यात दोन हजाराची वाढ करून अनुक्रमे ३२ व २२ हजार रुपये हेक्टरी कर्ज देण्याचा प्रस्ताव आहे. शासनाने जिल्हा बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट यावेळी ६२१ कोटी ठरवून दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उद्दीष्ट तब्बल २०० कोटी रुपयांनी वाढविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी जुन्याच दराने पीक कर्जाचे वाटप केले गेले. पीक कर्जाचा नवा दर ठरविण्यासाठी शुक्रवारी बँक संचालकांची बैठक होत आहे. या बैठकीत वाढीव दर मंजूर होताच कर्जातील उर्वरित रक्कम शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. संचालक मंडळापुढे राज्य सहकारी बँकेचे कर्ज, जिल्हा बँकेच्या जुन्या पीक व मुदती कर्जाची वसुली, साहित्य खरेदी असे अनेक विषय चर्चेसाठी येणार आहेत. यंदाच्या ६२१ कोटींच्या उद्दीष्टापैकी आतापर्यंत दीडशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप जिल्हा बँकेने केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कर्जाची उचल वाढणार आहे. या काळात बँकेच्या ग्रामीण भागातील शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची गर्दी पहायला मिळते. एकाच वेळी सर्वजण कर्ज उचलत असल्याने चलनी नोटांचा तुटवडा निर्माण होतो. तो होऊ नये म्हणून आतापासूनच उपाययोजना केल्या गेल्याचे बँकेतून सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या कर्ज वाटपाची वसुलीही बँकेने झपाट्याने सुरू केली असली तरी मुदती कर्जाच्या वसुलीत बँकेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षीच्या ४२१ कोटींच्या पीक कर्ज वाटपापैकी ३०२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. त्यात दुष्काळातील शासनाकडून परस्पर झालेल्या कर्ज वसुलीचाही समावेश आहे. कृषी विषयक विविध योजना व वाहन, व्यवसाय, उद्योगासाठी बँकेने १२० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. परंतु त्यातील केवळ सहा कोटी रुपये वसूल झाले. ही वसुली वाढविण्याचे आव्हान बँकेपुढे आहे. (प्रतिनिधी)