शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

कापूस उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:49 PM

यावर्षी मान्सूनचे आगमन २० दिवस लांबले. यामुळे खरिप लागवडीचा कालावधी खोळंबला. यातून कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली. प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी ठराविक कालावधी असतो. या कालावधीच्या पुढे ठराविक पिकांची लागवड झाल्यास त्याचा उत्पादनाला फटका बसतो. त्याचाच प्रत्यय २०१९ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे.

ठळक मुद्देदहा लाख क्ंिवटलची तफावत : सोयाबीन, ज्वारीला पावसाचा तडाखा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्ग प्रकोपाने शेतशिवाराची हालत अतिशय खराब झाली. कृषी उत्पादनात दरवर्षी मोठ्या प्रमाणात घट नोंदविली जात आहे. निसर्ग प्रकोपाचा सर्वाधिक फटका परंपरागत पिकांना बसला आहे. कापसाचे उत्पादन दहा लाख क्विंटले घटले आहे. तर सोयाबीनच्या उत्पादनातही पाच लाख क्विंटलची घट नोंदविण्यात आली आहे.यावर्षी मान्सूनचे आगमन २० दिवस लांबले. यामुळे खरिप लागवडीचा कालावधी खोळंबला. यातून कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली. प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी ठराविक कालावधी असतो. या कालावधीच्या पुढे ठराविक पिकांची लागवड झाल्यास त्याचा उत्पादनाला फटका बसतो. त्याचाच प्रत्यय २०१९ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे.ऋतुचक्र प्रभावीत झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली आहे. कीडींचे आक्रमण, अपुरा पाऊस आणि पावसाचा खंड यातून कोरडवाहू क्षेत्र पूर्णत: कोलमडले आहे. याचा सर्वाधिक फटका कापसाला बसला आहे. एक ते दोन वेच्यातच कोरडवाहू क्षेत्रातील कापसाची उलंगवाडी झाली आहे. सध्या बाजारात केवळ ५ लाख १९ हजार क्विंटल कापूस विक्रीला आला आहे. गतवर्षी या सुमारास १५ लाख क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी झाली आहे. संपूर्ण हंगामात ही खरेदी १८ लाख क्विंटलच्या घरात नोंदविण्यात आली आहे. त्या तुलनेत २०१९ मध्ये १० लाख क्विंटल कापसाची घट नोंदविण्यात आली.सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद या पिकांची अवस्था अशीच आहे. २०१८ मध्ये ९ लाख ७४ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. आठ हजार ३८६ क्विंटल ज्वारीची खरेदी झाली. ८ हजार १४१ क्विटल उडीद आणि दोन हजार ५०० क्विंटल मुगाची खरेदी झाली आहे. २०१९ मध्ये हे उत्पादन ३० टक्क्याने घटले आहे. यामुळे बाजार समित्यामधील आवक मंदावली आहे.निसर्ग प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यानंतरही कृषी उत्पादनाच्या दरात कुठलीही दरवाढ नोंदविली गेली नाही. याला कांदा अपवाद राहिला आहे. कापसाचे दर २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये हजार रूपयाने कमी आहेत. तर सोयाबीनच्या दरात थोडी वाढ नोंदविण्यात आली आहे. खर्चाच्या तुलनेत ही दरवाढ नाममात्र आहे. यामुळे कृषी उत्पादनावर अवलंबून असणारे कुटुंब अडचणीत सापडले आहेत.शेतीच्या पुनरुज्जीवनाची गरजशेती व्यवसायाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. यासोबतच खत, बियाणे, औषधांवर अनुदान देण्याची आवश्यकता आहे. खर्चावर आधारीत दर शेतमालास मिळण्याची गरज आहे. तरच शेतीचे पुनरुज्जीवन शक्य होणार आहे.

टॅग्स :cottonकापूस