शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या पात्या गळाल्या; सोयाबीनला फुटतील कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

यावर्षी पाऊसही चांगला असल्याने आतापर्यंत पिकांची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून वणी व मारेगाव तालुक्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. या दोनही तालुक्यांमधील सखल भागात असलेल्या शेतांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत सोयाबीन व कपाशीचे पीक चांगले असले तरी हवामान विभागाने आणखी सात दिवस या भागात पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून वणी उपविभागात सुरू असलेल्या धुवाॅंधार पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. हा पाऊस आणखी दोन-तीन दिवस असाच राहिला, तर सोयाबीन व कपाशीवर बुरशीजन्य आजार येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. वणी तालुक्यात ४५ हजार हेक्टरवर कपाशीची, तर नऊ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी जून महिन्यातच पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांनी अगदी वेळेवर पेरण्या आटोपल्या. वणी उपविभागात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. यावर्षी पाऊसही चांगला असल्याने आतापर्यंत पिकांची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून वणी व मारेगाव तालुक्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. या दोनही तालुक्यांमधील सखल भागात असलेल्या शेतांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत सोयाबीन व कपाशीचे पीक चांगले असले तरी हवामान विभागाने आणखी सात दिवस या भागात पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार पाऊसही सुरू आहे. पावसाचे सातत्य कायम राहिल्यास सोयाबीनच्या शेंगाना कोंब फुटून त्यावर बुरशी येण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. अतिपावसामुळे कपाशीची बोंडेही सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसामुळे सध्या या भागात दमट वातावरण असून, पिकांवरील बुरशीजन्य आजारांसाठी हे वातावरण पोषक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीचे बियाणे पेरले, त्या बियाण्यांच्या पिकाला या पावसाचा अधिक धोका असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.उभ्या पिकांची नासाडी  - एकीकडे सातत्याने पाऊस सुरू असल्याने पिके धोक्यात आली असताना दुसरीकडे वणी, मारेगाव तालुक्यातील शेतशिवारात वन्यजीवांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. राेही, रानडुकरे शेतात शिरून उभ्या पिकांची नासाडी करत आहेत.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती