शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवक आक्रमक

By admin | Updated: March 1, 2017 01:17 IST

नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी आक्रमक पावित्रा घेतला.

सत्ताधारी अगतिक : नामुष्की टाळण्याचा प्रयत्न यवतमाळ : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी आक्रमक पावित्रा घेतला. शहरासाठी २३ कोटी ७५ लक्ष रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहापुढे ठेवण्यात आला. सुरुवातीलाच अर्थसंकल्पाची प्रत एक दिवस अगोदर मिळाल्यावरून सत्ताधारी भाजपाच्या गटनेत्यांनी आक्षेप घेतला. यावर मुख्याधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. येथून अर्थसंकल्पीय सभा भरकटली ती शेवटपर्यंत मूळ पदावर आलीच नाही. शेवटी मागील वर्षीची नामुष्की टाळण्यासाठी बजेट मंजुरीचा प्रयत्न सुरू होता. नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. अर्थसंकल्पाला सभागृहापुढे ठेवण्यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. या चर्चेत सदस्यांनी सूचविलेल्या दुरुस्त्या अंतिम अर्थसंकल्पात समाविष्ठ झाल्याच नाही. यावरून भाजपा नगरसेवकांनी व विषय समिती सभापतींनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. याच गोंधळात अर्थसंकल्पाचे वाचन सुरू होते. दरम्यान काँग्रेस गटनेत्याने अर्थसंकल्पावर आक्षेप घेत नगरसेवकांच्या सूचनांचाही त्यात समावेश केला जावा, अशी मागणी केली. तसेच लेखी स्वरूपाचे निवेदनही नगराध्यक्ष व सीओंना सुपूर्द केले. ग्रामीण भागातील मालमत्ता मूल्यांकनाचा मुद्दा पुन्हा सभेत गाजला. यावरच बराच वेळ खर्च झाला. तसेच शहरातील दुकान गाळ्याचे भाडे मूल्यांकन व निर्धारण का झाले नाही यावरून मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. अर्थसंकल्पीय सभा असली तरी अवांतर मुद्यांवरच सभागृहात चर्चा सुरु होती. याच स्थितीत अर्थसंकल्पाचे वाचन केले जात होते. काही मुद्यांना विरोध तर दुरुस्त्या सुचवून बजेट मंजुरीचा प्रयत्न झाला. वृत्तलिहिपर्यंत सभा सुरूच होती. (कार्यालय प्रतिनिधी)