कोरोनाचे रुग्ण चारशेच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:17+5:30

यवतमाळ शहर व जिल्ह््यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व पोलिसांच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे शनिवारी सायंकाळी यवतमाळात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडून रानडे यांनी विविध मुद्यांवर आढावा घेतला.

Corona's patient next to four hundred | कोरोनाचे रुग्ण चारशेच्या पुढे

कोरोनाचे रुग्ण चारशेच्या पुढे

Next
ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह १२२ । २० रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारीसुद्धा जिल्ह्यात २० जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून यात १३ पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ४१७ झाली आहे. तर १२२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले दोन जण उपचारानंतर बरे झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
शनिवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांमध्ये यवतमाळ शहरातील तायडेनगर येथील एक पुरुष व एक महिला, लहान वडगाव येथील तीन पुरुष व दोन महिला आणि यवतमाळ येथील आणखी एक महिला यांचा समावेश आहे. दिग्रस शहरातील बालाजीनगर येथील एक पुरुष, बाराभाई मोहल्ला येथील एक महिला, देवनगर येथील एक महिला तसेच दिग्रस येथील सहा पुरुष, पुसद शहरातील गांधी वॉर्ड येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील शास्त्री वॉर्ड येथील एक पुरुष आणि पुसद येथील एका महिलेचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शनिवारी एकूण ३०६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० पॉझिटिव्ह, २६८ निगेटिव्ह तर १८ नमुन्यांचे अचूक निदान झाले नाही. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१७ आहे. यापैकी २८७ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १४ मृत्यू झाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी ८० नमुने तपासणीकरिता पाठविले.
पोलीस महानिरीक्षक दाखल
यवतमाळ शहर व जिल्ह््यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व पोलिसांच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे शनिवारी सायंकाळी यवतमाळात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडून रानडे यांनी विविध मुद्यांवर आढावा घेतला. जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये गुन्हे शाबिती व शिक्षेचे प्रमाण गेल्या तीन वर्षात तीन पटीने वाढल्याच्या निमित्ताने रानडे यांनी समाधान व्यक्त केले.परिक्षेत्रातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे मकरंद रानडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Corona's patient next to four hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.