शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रोखायला गेले कोरोना, सापडला बालविवाह; सहा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमा भागात मंगळवारी हा प्रकार घडला. पांढुर्णा गावातील एका मंदिरात बालविवाह होत असल्याची माहिती हिंगोली जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. त्या आधारे त्यांचे अधिकारी व हिंगोली पोलीस यांनी विवाहस्थळ गाठले. मात्र तोपर्यंत विवाह संपन्न झाला. घटना यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत घडल्याने पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांना माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुर्गम ठिकाणी एका मंदिरात कोरोनाचे नियम डावलून लग्न लावले जात आहे, अशी गुप्त खबर प्रशासनाला मिळाली. त्यावरून कारवाईसाठी धडकलेल्या अधिकाऱ्यांपुढे भलताच प्रकार आला. कोरोनाचे नियम तर डावलले गेलेच, पण लग्नातील नवरी मुलगीही अल्पवयीन निघाली. त्यामुळे या प्रकरणात गर्दी करणे व अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे आदी बाबीसंदर्भात सहा जणांवर खंडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमा भागात मंगळवारी हा प्रकार घडला. पांढुर्णा गावातील एका मंदिरात बालविवाह होत असल्याची माहिती हिंगोली जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. त्या आधारे त्यांचे अधिकारी व हिंगोली पोलीस यांनी विवाहस्थळ गाठले. मात्र तोपर्यंत विवाह संपन्न झाला. घटना यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत घडल्याने पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांना माहिती देण्यात आली. यवतमाळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात खंडाळाचे ठाणेदार गोपाल चावडीकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर घटनास्थळी पोहोचले. ग्रामसेवक पांडुरंग बुरकुले यांनी फिर्याद दिल्यानंतर यात ३० वर्षीय नवरदेव, लग्न जुळविणारे व लग्न लावून देणारे अशा व्यक्तींवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच कोरोना काळात गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईसाठी यवतमाळ बाल संरक्षण कक्षाचे महेश हळदे, माधुरी पावडे, सुनिल बोकसे, हिंगोली येथील बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी सहकार्य केले.केदारलिंगी मंदिरात झालेल्या या लग्नाला ७० ते ८० लोक उपस्थित असल्याचे ग्रामसेवकांनी फिर्यादीत म्हटले आहे. या अज्ञातांचाही आता पोलिसांमार्फत माग काढला जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न