शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना घेऊन आलेले अखेर दिल्लीला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

दीड महिन्यांपासून दिल्ली येथून ११ जण धामणगाव रेल्वे मार्गे यवतमाळात दाखल झाले होते. त्यांनी बाभूळगाव, सावर, नेर येथेही भेटी दिल्या होत्या. या ११ पैकी आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. भोसा परिसरात त्यांचे वास्तव्य होते. तेथूनच त्या भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे मानले जाते. कोरोनाबाधित या आठ जणांवर गेली महिनाभरा उपचार करण्यात आले.

ठळक मुद्दे‘मरकज’चे आठ पॉझिटिव्ह झाले निगेटिव्ह : उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालच्या नागरिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्लीतील मरकजच्या संमेलनाला हजेरी लावून जिल्ह्यात दाखल झालेल्या व येताना सोबत कोरोना आजार घेऊन आलेल्या परप्रांतीय नागरिकांना शुक्रवारी अखेर दिल्लीला रवाना करण्यात आले. त्यामध्ये उत्तरप्रदेश व पश्चिम बंगालच्या नागरिकांचाही समावेश आहे.दीड महिन्यांपासून दिल्ली येथून ११ जण धामणगाव रेल्वे मार्गे यवतमाळात दाखल झाले होते. त्यांनी बाभूळगाव, सावर, नेर येथेही भेटी दिल्या होत्या. या ११ पैकी आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. भोसा परिसरात त्यांचे वास्तव्य होते. तेथूनच त्या भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे मानले जाते. कोरोनाबाधित या आठ जणांवर गेली महिनाभरा उपचार करण्यात आले. या पॉझिटिव्ह परप्रांतीय नागरिकांचे नमुने आता निगेटिव्ह आले आहे. कोरोनामुक्त झाल्याने या आठ जणांसह ११ जणांना शुक्रवारी बडनेरा रेल्वे मार्गे दिल्लीकडे रवाना करण्यात आले. तेथून ते पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेशाला आपल्या गावी जाणार आहेत.वास्तविक दिल्लीच्या मरकज कनेक्शनचे एकूण २२ लोक आढळून आले होते. त्यापैकी ११ जण रवाना झाले. उर्वरित ११ जण पश्चिम बंगालचे असून त्यांनाही पुढील तीन-चार दिवसात आपल्या गावी रवाना केले जाणार आहे. या ११ पैकी एकाची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले जाते.कोरोनाबाबत एकूणच जिल्ह्यात दिलासादायक चित्र आहे. सुरुवातीला मुंबई, पुण्यानंतर यवतमाळातच कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे यवतमाळ अचानक देशाच्या नकाशावर चमकले.भोसा येथे उद्रेक झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली होती. एवढेच नव्हे तर नेर व उमरखेड तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. परंतु आता कोरोना संसर्ग सध्यातरी जिल्ह्यात नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. प्रशासन व शासकीय यंत्रणेचे परिश्रम, नागरिकांची जागरुकता, व्यापारी-व्यावसायिकांचा संयम याला हे संपूर्ण श्रेय दिले जात आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा शंभरवर गेला आहे. परंतु त्यातील रुग्ण पॉझिटिव्हमधून निगेटिव्हमध्ये येत आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा वेग चांगला आहे. सध्या ४५ बाधितांवर उपचार सुरू आहे.५५ जण झाले कोरोनामुक्त, आता केवळ ४५ बाधितांवर उपचारजिल्ह्यात अचानक वाढलेला कोरोना गेल्या आठवडाभरापासून चांगलाच नियंत्रणात आला आहे. ५५ जण कोरोनामुक्त झाले आहे. आता केवळ ४५ जण बाधित म्हणून उपचार घेत आहे. तेसुद्धा लवकरच कोरोनामुक्त होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी सतत जागरुक राहून दाखविलेला संयम फायद्याचा ठरल्याचे मानले जाते. नागरिकांनी घरात राहून लॉकडाऊनचे काटेकोर पालन केल्यानेच आज जिल्ह्याने कोरोनासारख्या महामारीवर मात केल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या